Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वृद्धाचे ५० हजार चोरणारा ‘पुष्पा’ अखेर पकडला ! एस.पी. नी दिलेला शब्द खरा केला, नंदुरबार पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव

team by team
February 11, 2022
in क्राईम
0
वृद्धाचे ५० हजार चोरणारा ‘पुष्पा’ अखेर पकडला ! एस.पी. नी दिलेला शब्द खरा केला, नंदुरबार पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव

नंदूरबार l प्रतिनिधी
गेल्या आठवड्यात डामरखेडा ता.शहादा जि.नंदुरबार येथील ७५ वर्षीय वृद्धाचे ५० हजार रुपये प्रकाशा येथून चोरीला गेले होते. पत्नीचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे सानुग्रहाची रक्कम बॅंकेतून घेऊन जाताना त्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने त्या वृद्धाबद्दल लोकांमध्ये सहानुभूतीची लाट पसरली.दुसरीकडे नंदुरबार पोलीसांनी वर्गणी काढून त्याला पैसे दिल्याने पोलीसांची प्रतिमा उजळली. या घटनेची माहिती प्रचंड व्हायरल झाली होती.त्या वृद्धाचे पैसे चोरणाऱ्या दोन चोरट्यांना जेरबंद करुन एस.पी. नी त्या वृद्धास “तुमचे पैसे परत मिळवून देऊ” असा दिलेला शब्द खरा केल्याने नंदुरबार पोलींसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.नंदुरबारचे एस.पी. पी.आर.पाटील यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास १० हजार रु.चे बक्षिस जाहिर केले आहे.
मिठू उर्फ विनोद वीरसिंग पवार वय २२ व उर्फ व राजू गिरीष मावेशी वय २१ दोघे रा. धनपूर ता.तळोदा जि.नंदुरबार अशी त्या दोन चोरट्यांची नावे आहेत.चोरीची घटना घडल्यानंतर ७५ वर्षांच्या पदम कोळी या वृद्धाच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन झालेबाबतचे सानुग्रह अनुदानाचे पैसे चोरीला जाणे. पोलीसांनी वर्गणी काढून या वृद्धास पैसे देणे यामुळे या घटनेला भावनिक टच मिळाला होता.
आठवडाभरापासून नंदुरबार एस.पी. नी जिल्हा पोलीसांना हे चोर पकडून देणाऱ्यास १० हजार रु.चे बक्षिस जाहिर केले होते. तसेच स्थानिक गुन्हे शाखेची दोन खास पथके तपासासाठी नेमली होती व चोर पकडेपर्यंत मला तोंड दाखवू नका अशी सूचना त्यांना केली होती त्यानुसार पोलिसांनी संपूर्ण शहादा व तळोदा तालुका पिंजून काढला. चोरट्यांने हेअर कटिंग मध्ये “PUSHPA” अशी अक्षरे कोरल्याची माहिती घटनास्थळावरील लोकांनी सांगितल्याने अथक परिश्रमाने ती अक्षरे कोरणारा सलून कारागीर शोधून काढला व त्याच्या मदतीने विनोद उर्फ मिठू याला अटक केली.घटनेची चर्चा झाल्यानंतर चोरट्यांची चोरलेले पैसे खर्च करण्याची हिंमत झाली नाही तर दुसरीकडे पदम कोळी बाबांनीही पोलीसांनी वर्गणी काढून दिलेले पैसे खर्च केले नव्हते. आज शहादा पोलीसांनी चोरांना पकडल्याचे पदम कोळी यांना कळवल्यानंतर त्यांनी एस.पी. ना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.त्याप्रमाणे शहादा पोलींसांनी त्यांची भेट घालून दिली. वयोवृद्ध पदम कोळी यांनी एस.पी.ना पाहताच आनंदाने मिठी मारली व सोबत आणलेला फुलांचा गुच्छ त्यांना दिला.पोलीसांनी वर्गणी काढून दिलेले पैसे परत करण्याचा प्रामाणिक असलेल्या पदम कोळी यांनी प्रयत्न केला परंतु त्यास नकार देऊन “तुमच्या पोलीस मुलांनी तुम्हाला दिलेली ती भेट आहे असे समजा” असे एस.पी.नी.म्हणताच वयोवृद्ध पदम कोळी प्रचंड भावनिक झाले होते. पत्नीची आठवण असेलेले चोरीला गेलेले पैसे परत मिळाल्यांने पोलीसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलेल्या कोळी आजोबांना पहायला नंदुरबार पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती.
या बहुचर्चित चोरीची उकल करण्यासाठी नंदूरबारचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या थेट देखरेखीखाली अपर पोलीस अधीक्षक विजय पवार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी मेहनत घेतली. या कामगिरीमुळे नंदुरबार पोलीसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मा. आ. चंद्रकांत रघुवंशी हे नंदुरबार जिल्ह्यातील शिवसैनिकांचे कुटुंब प्रमुख : माजी आ. रवींद्र मिर्लेकर

Next Post

नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सुझलॉनच्या ब्लेडची वाहतूक करणारे सहा वाहने पकडली

Next Post
नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सुझलॉनच्या ब्लेडची वाहतूक करणारे सहा वाहने पकडली

नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सुझलॉनच्या ब्लेडची वाहतूक करणारे सहा वाहने पकडली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add