तळोदा l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे विठ्ठल रुखमाबाई मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली आहे.या ठिकाणी आमदार राजेश पाडवी यांनी भेट देत जलदगती तपास करण्यांचा सुचना दिल्या.
शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे नवीन वसाहतीत विठ्ठल रुखमाबाई मंदिरात मुर्ती वरचे चांदी चे दागिने काही अज्ञात चोरानी काही दिवसांपूर्वी लंपास केले. मंदिर परीसरातील नागरिकांनी आमदार राजेश पाडवी यांना संपर्क केला असता आमदार यांनी भेट देवुन पहाणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक दिपक बुधंवत यांना जलदगती तपास करण्यांचा सुचना दिल्या या वेळी परीसरातील नागरिक उपस्थित होते.










