तळोदा l प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघच्या नंदूरबार जिल्हा उपाध्यक्षपदी कैलास प्रभाकर चौधरी यांनी निवड करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाचे प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी यांनी एका पत्रकान्वये निवड करीत नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी तैलीक समाज अध्यक्ष प्रभाकर चौधरी तळोदा, संदीप चौधरी जिल्हा अध्यक्ष तैलीक महासभा, अशोक भिकाजी चौधरी प्रदेश सरचिटणीस तेली महासभा, राजेश भटु चौधरी,भरत पांडुरंग भामरे , संदीप रविंद्र चौधरी, दिलीप बाबुलाल चौधरी, प्रविण भरत चौधरी, मनोज मधुकर चौधरी आदींनीसह समाज बांधव उपस्थित होते.










