Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे उद्यापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५६ वे प्रदेश अधिवेशन

team by team
February 10, 2022
in राज्य
0
नंदूरबार येथे उद्यापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५६ वे प्रदेश अधिवेशन

नंदुरबार | प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेशाचे ५६ वे प्रदेश अधिवेशन उद्या दि.११ ते १३ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत नंदुरबारात आयोजीत करण्यात आले आहे. या अधिवेशनात शिक्षण क्षेत्रात झालेले बदल, सामाजिक प्रश्‍न तसेच शिक्षणासोबतच विविध क्षेत्रात झालेल्या भ्रष्टाचाराबाबतचे प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची माहिती अभाविपचे प्रदेश मंत्री सिद्धेश्‍वर लटपटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री.लटपटे म्हणाले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५६ वे प्रदेश अधिवेशन नंदुरबारातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे प्रदर्शनी उद्घाटन उद्या दि. ११ फेब्रुवारी रोजी वाजता करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे. अधिवेशनाचे उद्घाटन जनजातीय राष्ट्रीय अध्यक्ष हर्ष चौहान यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण, अभाविपचे राष्ट्रीय संघटनमंत्री आशिष चौहान उपस्थितीत राहणार आहेत.
या अधिवेशनामध्ये सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रातील गैरकारभारावर ‘आसुड’ या विषयांवर प्रस्ताव पारित केले जाणार आहेत. प्रास्ताविक सत्रामध्ये प्रदेशमंत्री मंत्री प्रतिवेदनामध्ये अभाविपच्या मागील वर्षाच्या कार्याचे सिंहावलोकन करणार आहेत तसेच शैक्षणिक वर्ष २०२२- २३ साठी पश्चिम महाराष्ट्र व देवगिरी या दोन प्रांताचे प्रदेश मंत्री आणि प्रदेश अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.
प्रदेश अधिवेशनामध्ये दोन भाषण सत्र होतील, यात अभाविपचे राष्ट्रीय सह संघटनमंत्री प्रफुल्ल आकांत ‘जनजाती गौरव’ या विषयावर व प्रा.डॉ. मनिष जोशी हे अभाविप कार्यविस्तार या विषयावर भाषण करतील.नुकतेच राज्य शासनाने आणलेल्या सार्वजनिक विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयकामुळे शिक्षण क्षेत्रावर काय परिणाम होतील विषयात परिसंवाद होणार आहे. यामध्ये शिक्षण क्षेत्रातील तज्ञ मंडळी आपले मत व्यक्त करतील. महाराष्ट्रातील विविध भागाती छात्र नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर सभादेखील आयोजित केली जाणार आहे.अधिवेशनाच्या समारोपामध्ये अभाविपचे नवनिर्वाचित प्रदेश मंत्री अभाविपच्या कार्याची आगामी दिशा मांडणार आहेत.तसेच यावेळी देवगिरी आणि पश्चिम महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करणार आहेत. त्यानंतर ध्वजावतरणाने या अधिवेशनाची सांगता होणार आहे. या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील २०० विद्यार्थी प्रतिनिधी या नंदुरबार नगरीमध्ये दाखल होणार आहेत.
यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नंदुरबार शहरमंत्री जयेश सोनवणे, स्वागतसमिती अध्यक्ष सौ.इलाबाई गावित, स्वागत समिती सचिव प्रा.संतोष पाटील, व्यवस्थाप्रमुख प्रा.गिरीश पवार उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

पंतप्रधान आवास योजनेच्या जाचक अटी रद्द करण्याची बिरसा फायटर्सची मागणी

Next Post

बालविवाह होणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच व विवाहाची नोंद करणाऱ्यांचे पद रद्द होणार : रुपाली चाकणकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add