Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बिलाडी- नारायणपूर रस्ता पूर्ववत करा ,भारतीय किसान सेनेची मागणी

team by team
February 10, 2022
in राजकीय
0
बिलाडी- नारायणपूर रस्ता पूर्ववत करा ,भारतीय किसान सेनेची मागणी

नंदुरबार | प्रतिनिधी
बिलाडी- नारायणपूर रस्ता पूर्ववत करा अशी मागणीचे निवेदन भारतीय किसानतर्फे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना देण्यात आले.
रेल्वे प्रशासनाने एल.सी.गेट नं .८७ बिलाडी – नारायणपुर रस्ता बंद करुन अंडरग्राऊंड रस्त्याची निर्मिती केली होती . त्यानंतर सदर रस्ता सुरु झाला . परंतु त्यावेळी रेल्वे प्रशासनाने आमच्या काही शेतकर्‍यांना आश्वासन दिले होते की , आमचे काम झाल्यानंतर आम्ही सर्व शेतकर्‍यांसाठी हा रस्ता चांगल्या दर्ज्याचा बनवुन देवू . परंतु काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रशासन सदर रस्ता तसाच सोडून निघुन गेले . यासाठी आमचे सर्व शेतकरी बांधव मागील २ वर्षांपासून अनेक अडचणींचा सामना करीत आहेत . तेथुन शेतमाल ने – आण करतांना ट्रक व ट्रॅक्टर आणतांना तारेवरची कसरत करावी लागते . यामुळे अनेकदा ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण बिघडून अपघात होवुन जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत .२१२२ यासाठी रेल्वे प्रशासनाने एल.सी. गेट नं . ८७ बिलाडी – नारायणपुर रस्त्यावर येवून आमचे काही शेतकरी बांधवांशी विचार – विनिमय करुन आमच्या समस्येचे निराकरण करावे यासाठी आम्ही रेल्वे प्रशासनाला वेळोळी पत्रव्यवहार करुन देखील रेल्वे प्रशासनाने आमच्या मागणीकडे काही एक लक्ष दिले नसून आमच्या मागणीला केराची टोपली दाखविली आहे . बिलाडी – नारायणपुर रस्ता बंद केला असून तो सुरू करण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील ते सुरु न केल्या मुळे आमच्या शेतकरी बांधवांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. जर मागणी मान्य झाली नाही तर आमचे शेतकरी बांधव येत्या काळात रेल रोको करण्याच्या प्रयत्नात आहेत . तसे काही झाल्यास त्यास सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार राहील असे सांगण्यात आले .या बाबतचे निवेदन शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना देण्यात आले. यावेळी किसान सेनेचे प्रदेश उपाद्यक्ष पंडित तडवी, जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी भटके विमुक्त जिल्हाद्यक्ष कांतीलाल जाधव ,शहराध्यक्ष राजेश नानाभाऊ माळी , कैलास झगा माळी हिंमत सोमा माळी गंगाराम शामजी माळी मधुकर माळी कैलास माळी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हा कॉंग्रेसतर्फे नरेंद्र मोदी यांचा निषेध

Next Post

पद आणि प्रतिष्ठेपेक्षा कार्याला महत्त्व द्यावे : दिशा पिंकी शेख

Next Post
पद आणि प्रतिष्ठेपेक्षा कार्याला महत्त्व द्यावे : दिशा पिंकी शेख

पद आणि प्रतिष्ठेपेक्षा कार्याला महत्त्व द्यावे : दिशा पिंकी शेख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add