नंदुरबार | प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र राज्याची बदनामी केल्याच्या निषेधार्थ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या नंदुरबार जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला.
जिल्हाधिकारी महेश पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कॉंग्रेस पक्षाने संपूर्ण देशांमध्ये कोरोना पसरविला असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये केले .ही बाब महाराष्ट्राच्या व राज्यातील जनतेचा घोर अपमान करणारी आहे. वास्तविक नमस्ते ट्रम या कार्यक्रमातून मोदींनी लाखोंची गर्दी करून देशात करून पसरवला त्यामुळे विमानतळ वगैरे बंद करावे लागले परिणामी करण्याचा विस्फोट झाला खर्या अर्थाने करून प्रसंगी मोदी सरकारने केल्याचा आरोप कॉंग्रेसने निवेदनातून केला आहे. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षातर्फे संपूर्ण देशामध्ये आंदोलन घेण्यात आले नंदुरबार जिल्ह्यामध्ये जिल्हा दंडाधिकारी व जिल्हाधिकारी यांनी कलम १३७ लागू केल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर निदर्शने न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीव्र निषेध करण्यात आला या निवेदनावर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाची नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, सरचिटणीस पंडित पवार, स्वयंरोजगार शहराध्यक्ष रऊफ शहा, भास्कर सोनवणे, देवा चौधरी, इक्बाल खाटीक, रवींद्र कोठारी, राजेंद्र पाटील, खंडेराव पवार आदींच्या स्वाक्षर्या आहेत.










