म्हसावद l प्रतिनिधी
मनात इच्छा शक्ती असेल तर कुठलेही ध्येय गाठणे शक्य होते .आपले ध्येय निश्चीत करुन त्या दिशेने यशस्वी वाटचाल करून पोलीस होण्याचे स्वप्न शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा येथील तरुणीने प्रत्यक्षात साकारले आहे . हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या कुटुंबातील दिपाली ने आपल्या हिमतीच्या व जिद्दीच्या जोरावर पोलीसाच्या नोकरीला गवसणी घातली आहे . नुकत्याच लागलेल्या यादीमध्ये सांगली महिला पोलीस शिपाई या पदावर तिची निवड झाली आहे . शिंदखेडा तालुक्यातून पोलीस दलात सहभागी होणारी ती पहिली महिला ठरली आहे .
एखाद्या व्यक्तीने निश्चय केला की मला हे व्हायचेच आहे तर ते स्वप्न पूर्ण होऊ शकते , हे सिद्ध करुन दाखविले आहे .एका लहानशा गावातील मुलीने , जिद्द व चिकाटीने आज ती युवतीने मेहनत घेत पोलीस दलात भरती झाली . धुळे जिल्हयातुन एकमेव भरती झालेली ती महिला पोलीस कर्मचारी झाली असून पोलीस दलाच्या सांगली जिल्ह्या कार्यालयात निमणूक होणार आहे . तिच्या या यशाबाबत परिसरात विशेष कौतुक होत आहे .
शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा येथील दिपाली मुरलीधर शिरसाठ हिने जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण करत हे यश मिळविले आहे .वडीलांनी वेगवेगळे हत्यार वापरून ओबडधोबड लाकडाला कलाकुसर करून योग्य आकार देण्याचे काम , अर्थात सुतार , गवंडी चे काम करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु आहे . दिपालीने घराची हलाखीच्या परिस्थितीत काबाडकष्ट करत बी .ए चे शिक्षण पूर्ण केले . तिचे काका जगन शिरसाठ यांनी पोलीस भरतीचे प्रयत्न केले मात्र त्यांना त्यात यश आले नाही . त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोलीस दलात सहभागी होईल अशी दिपालीने मनात बांधली . घरीच अभ्यास सुरु ठेवला तर गावातील रिकाम्या जागेवर भरतीपूर्व सराव सुरू करून आपली इच्छाशक्ती प्रबळ ठेवली . नुकत्याच झालेल्या सांगली पोलीस दलातील पोलीस भरतीमध्ये मागास प्रवर्गातुन महिला ग्रामीण पोलीस म्हणून निवड झाली . यामुळे तिचे गावातून सामाजिक संस्थामधून अभिनंदन होत आहे .
ग्रामीण भागातील मुलींनी आपण कमी नाही अशी खुणगाठ मनात बांधून जिद्दीने विविध भरतीमध्ये सहभागी झाले पाहिजे . भरतीची नोकरी हा विषय अधिक कठीण असला तरी जिद्द ठेवली तर यश मिळतेच .मी यापुढे एमपीएससीचा अभ्यास करत राहणार आहे .
दिपाली शिरसाठ .टाकरखेडा .