Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात 11 फेब्रुवारीपासुन राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शरद युवा संवाद यात्रा, प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख साधणार युवकांशी संवाद

team by team
February 9, 2022
in राजकीय
0
नंदुरबार जिल्ह्यात 11 फेब्रुवारीपासुन  राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शरद युवा संवाद यात्रा, प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख साधणार युवकांशी संवाद

नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.शरद पवार साहेब यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून राज्यभरात शरद युवा संवाद यात्रा काढण्यात येत आहे पहिल्या टप्प्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात दि.11 फेब्रुवारी 2022 रोजी शरद युवा संवाद यात्रा दाखल होणार असून त्यानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री.महेबुब शेख हे जिल्ह्यातील युवकांशी संवाद साधनार आहेत. या शरद संवाद यात्रेचे नंदुरबार जिल्ह्यात जल्लोषात स्वागत करण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यानिहाय युवकांशी संवाद साधण्यासाठी दि.11 ते 13 फेब्रुवारी 2022 असे सलग तीन दिवस युवक मेळावा होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांनी दिली आहे.
नंदुरबार येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात शरद युवा संवाद यात्रेसंदर्भात माहिती देण्यासाठी आज दि.9 फेब्रुवारी 2022 रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, राष्ट्रवादी युुवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांनी नंदुरबार जिल्ह्यात आगमन होणार्‍या शरद युवा संवाद यात्रेविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 81 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पहिल्या टप्प्यात दि.5 ते 15 फेब्रुवारीदरम्यान राज्यभरातील 358 तालुके व 27 महानगरांमध्ये शरद युवा संवाद यात्रा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी शरद युवा संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख हे दि.11 ते 13 फेब्रुवारी 2022 असे तीन दिवस नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर येवुन शरद युुवा संवाद यात्रेतून युवकांशी संवाद साधतील. तसेच युवकांचे संघटन, पक्ष बांधणी, गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेसची युवक शाखा व आगामी निवडणूकांविषयी आयोजित युवक मेळाव्यांतून मार्गदर्शन करतील. दि.11 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 3 वाजता शरद युवा संवाद यात्रेचे नंदुरबार येथे आगमन होईल. नंदुरबार येथील इंदिरा मंगल कार्यालय याठिकाणी दि.11 फेब्रुवारीला दुपारी 3 ते 5 वाजेदरम्यान युवक मेळावा, सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेदरम्यान तळोदा येथील राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क कार्यालयात युवक मेळावा होणार आहे. तसेच दि.12 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 ते 12 वाजेला अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी याठिकाणी युवक मेळावा, दुपारी 3 ते 5 वाजेदरम्यान धडगाव येथील बाबा चौकात युवक मेळावा होणार असून सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेदरम्यान शहादा येथील गरीब नवाज कॉलनीतील गॅस गोडावुनजवळ युवक मेळावा होईल. दि.13 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत नवापूर येथील अग्रवाल भुवन याठिकाणी युवक मेळाव्यातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख हे युवकांशी संवाद साधतील. या यात्रेनिमित्त जय्यत तयारी करण्यात आली असून जिल्ह्यात शरद युवा यात्रेेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात येईल, असेही पत्रपरिषदेतून सांगण्यात आले. याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्षा ॲड.अश्विनी जोशी, शहराध्यक्ष नितीन जगताप, प्रकाश भोई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा, अक्कलकुव्याचे माजी आमदार डॉ.नरेंद्र पाडवी यांचे निधन, भगदरी येथे निघणार अंत्ययात्रा

Next Post

टाकरखेडा येथील तरुणीने प्रत्यक्षात साकारले स्वप्न, जिद्दीच्या जोरावर पोलीसाच्या नोकरीला घातली गवसणी

Next Post
टाकरखेडा येथील तरुणीने प्रत्यक्षात साकारले स्वप्न,  जिद्दीच्या जोरावर पोलीसाच्या नोकरीला घातली गवसणी

टाकरखेडा येथील तरुणीने प्रत्यक्षात साकारले स्वप्न, जिद्दीच्या जोरावर पोलीसाच्या नोकरीला घातली गवसणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add