Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एक धाव शिक्षणासाठी; लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट संस्थेचा उपक्रम

team by team
February 8, 2022
in शैक्षणिक
0
एक धाव शिक्षणासाठी; लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट संस्थेचा उपक्रम

तळोदा l प्रतिनिधी
लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट ही सामाजिक संस्था ग्रामीण भागातील वंचित समुदायातील अनाथ, एकल पालकत्व, दुर्लक्षित, आर्थिक दृष्ट्या मागास वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षित, सक्षम व स्वावलंबी बनवून, त्यांनी देशाच्या प्रगतीत हातभार लावावा या भव्य दिव्य उद्देश समोर ठेऊन सदरील संस्था नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील 12 वर्षांपासून काम करत आहे. भारत देशातील 4 कोटी 20 लाख विद्यार्थी हे माध्यमिक शिक्षणापासून वंचित आहेत. ह्या विद्यार्थ्यांना दिशा दर्शक मार्गदर्शन नसल्याने परिणामी, हे विद्यार्थी दारिद्र्यामध्ये ओढले जात आहेत. यामुळे लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट सन २००५ पासून अशाच विद्यार्थ्यांसाठी कार्य करतांना दिसत आहे.
माध्यमिक शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट ने दि. २९ व ३० जानेवारी २०२२ रोजी “मॅरेथॉन” स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत यावर्षी १००० विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत पाठविण्याचा निर्धार संस्थेने केला आहे. ह्या उद्देशाने “मी धावणार, ते शिकणार” या संकल्पनेच्या आधारे अनेक लाभार्थ्यांनी आपला प्रत्यक्ष सहभाग नोंदविला आहे. यावेळी लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट नंदूरबार चे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी भरत परदेशी, तळोदा प्रकल्प अधिकारी किशोर शिंपी, अक्कलकुवा सहाय्यक प्रकल्प अधिकारी भूषण बूनकर, धडगाव सहाय्यक प्रकल्प अधिकारी अभिमन्यू पाडवी, कांतीलाल पाडवी, राकेश वळवी, संजय वळवी, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वळवी, विलास पावरा, दिनेश भोये, प्रल्हाद वसावे व लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. सदरील मॅरेथॉन तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, खापर, मोलगी येथील संस्थेच्या सेंटर ठिकाणी घेण्यात आली. यावेळी शेकडो लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला व शिक्षणाच्या प्रवाहात येण्याचा निर्धार केला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

ट्रान्स्फॉर्मरवरील वीज वाहिनीची तार तुटून १३ शेतकऱ्यांचा ७५ एकर ऊस जळून खाक

Next Post

दुचाकीच्या धडकेत एक ठार, दोन जण जखमी

Next Post
दुचाकीच्या धडकेत एक ठार, दोन जण जखमी

दुचाकीच्या धडकेत एक ठार, दोन जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add