नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात काल दि.6 फेब्रुवारी रोजी 40 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
नंदुरबार जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्ण प्रमाण कमी झाले आहे.त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.त्याच सोबत कोरोना मुक्तीचे प्रमाण ही जास्त आहे.दि.6 फेब्रुवारी रोजी 40 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यात नंदूरबार तालुक्यात 10, शहादा तालुका 19, धडगाव तालुका 9 तर बाहेरील जिल्ह्यातील 2 कोरोना रुग्ण आढळले आहेत.आतापर्यंत जिल्ह्यात 955 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.सध्या नंदूरबार जिल्ह्यात रिकव्हरी रेट 96 टक्के तर पॉझिटिव्ह रेट 16 टक्के आहे.जिल्ह्यात सध्याच्या घडीला 670 ॲक्टिव रुग्ण आहेत.