Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ऑलिंपिक रिंग साकारुन श्रॉफ हायस्कुलमध्ये खेळाडूंना शुभेच्छा

team by team
July 22, 2021
in शैक्षणिक
0
ऑलिंपिक रिंग साकारुन श्रॉफ हायस्कुलमध्ये खेळाडूंना शुभेच्छा

नंदुरबार | प्रतिनिधी
जापान येथे होऊ घातलेल्या जागतिक ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना घवघवीत यश लाभावे व देशाचे नाव त्यांच्या माध्यमातून उज्ज्वल व्हावे, या हेतूने श्रॉफ हायस्कूलतर्फे चिअर फॉर इंडिया हा  कार्यक्रम घेण्यात आला. एकात एक गुंफलेले ऑलम्पिक चिन्हाचे रिंग या कार्यक्रमाप्रसंगी साकारण्यात आले होते.
२०२० मध्ये आयोजित करण्यात आलेला ऑलम्पिक खेळ महोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आला होता. जपानमध्ये आता पुन्हा उद्या दि.२३ जुलैपासून या ऑल्मपिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑलिंपिकमध्ये २७० खेळाडूंचा भला मोठा भारतीय संघ जपानमध्ये दाखल झाला आहे. या संघात दहा खेळाडू महाराष्ट्र राज्यातील आहेत. देशाचे नाव उज्ज्वल व्हावे, खेळाडूंना आपले कौशल्य दाखवून स्पर्धा जिंकता यावी, या हेतूने येथील सार्वजनिक शिक्षण समिती संचलित श्रॉफ हायस्कूलमध्ये शुभेच्छा देण्याचा संकल्प कार्यक्रम आयोजित केला गेला. या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील, मुख्याध्यापिका सौ.सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक विद्या सिसोदिया, जगदीश पाटील, क्रीडा प्रमुख दिनेश ओझा, मुकेश बारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोहित सोनार या विद्यार्थ्याने ओलिंपिक खेळाचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला. तर शिक्षक जावेद धोबी यांनी ऑलम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंचा परिचय करून दिला. जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी देशाच्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच पॅरा ऑलिंपिक स्पर्धांमध्येही भारतीय खेळाडू सहभागी झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन सीमा पाटील तर आभार जावेद धोबी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडाशिक्षक भिकू त्रिवेदी, जगदीश वंजारी, कलाशिक्षक महेंद्र सोमवंशी, हेमंत पाटील, शिवाजी माळी, किशोर रौंदळ, नरेंद्र सुर्यवंशी, हेमंत लोहार, सुनील राणा आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. वरील कार्यक्रमाप्रसंगी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाचे सर्व नियमांचे काटेकोर  पालन करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

मोलगी येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते खावटी कीटचे वाटप

Next Post

तळोदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कोरोना योध्दांचा सन्मान व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

Next Post
तळोदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कोरोना योध्दांचा सन्मान व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

तळोदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कोरोना योध्दांचा सन्मान व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add