नंदुरबार- प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुका व्यवस्थापक माकत्या वसावे प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असुन सदर प्रकरणात खोट्या तक्रारीच्या आधारावर कारवाई करण्यात आली असल्याने आदिवासी संघटना आक्रमक पवित्रा घेतल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे. अक्कलकुवा तालुका व्यवस्थापक या पदावर कार्यरत असणारे माकत्या दमन्या वसावे यांना तडकाफडकीने त्यांना सेवा समाप्तीचे आदेश देऊन अन्यायकारक करण्यात आली होती.त्यांना सेवेत रुजू करुन घेण्यात यावे या करिता आमच्या संघटनेच्या वतीने यापूर्वीच निवेदन देण्यात आहे आले.त्यानिवेदनावर काही एक कार्यवाही करण्यात आली नाही.त्यामुळे दि. 10 फेब्रुवारी रोजी एकलव्य आदी आदिवासी युवा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या धडक मोर्चास आमच्या संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा असून क्रांतिवीर बिरसा मुंडा संघटना देखील पूर्ण ताकतीने जिल्हाभरातील कार्यकर्त्यांसह सहभागी होणार आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, आमची संविधानिक मागणी तत्काळ पूर्ण करण्यात यावी व माकत्या वसावे यांना तात्काळ सेवेत रुजू करण्यात यावे अशी मागणी करत आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून 10 फेब्रुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन तालुका व जिल्हास्तरावर देण्यात आले आहे.असे आंदोलन नियोजन समितीचे प्रमुख गणपत पाडवी यांनी सांगितले.या पत्रकावर जिल्हा उपाध्यक्ष संजय दिलीप तडवी यांची स्वाक्षरी आहे.