नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील टिमकमौली गावाजवळ ट्रॅक्टरखाली दबला गेल्याने २६ वर्षीय तरुण ठार झाल्याची घटना घडली.अक्कलकुवा पोलिस ठाण्यात मयताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, भाबलपूर ता.अक्कलकुवा येथील संजय काशिराम पाडवी (वय २६) हा त्याच्या ताब्यातील विना नंबरचे ट्रॅक्टरच्या पाठीमागे दोन ऊसाने भरलेल्या ट्रॉल्या ठाण्याविहिर ते टिमकमौली रस्त्याने घेवून जात होता. यावेळी ट्रॉलीचे चाक मातीमध्ये फसल्याने ट्रॅक्टर पुढे घेवून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना ट्रॅक्टर ट्रॉलीमधील हूक तुटल्याने ट्रॅक्टर उलटल्याने संजय पाडवी हा ट्रॅक्टरखाली दबला गेल्याने गंभीर दुखापत होवून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ताराचंद काशिराम पाडवी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात मयत संजय पाडवी याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४(अ), २७९, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रमेश पाटील करीत आहेत.