नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथे जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या ऑनलाईन स्थायी समितीत तालुक्यातील वसलाई येथे झालेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामाच्या भुमिपुजन प्रसंगी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थीत नसल्याने त्यांच्यावर कारवाई बाबत ठराव करण्यात आला.तसेच तीनसमाळ व डेब्रामाळ येथील पाणीपुरवठ्याबाबत चौकशी समिती नेमण्यात आली असुन विविध विषयांनी आजची सभा गाजली.
नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या स्थायी समितीच्या ऑनलाईन बैठकीच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा ॲड.सिमा वळवी होत्या.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जि.प.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी,समाजकल्याण सभापती रतन पाडवी,कृषि सभापती गणेश पराडके,सभापती निर्मला राऊत, शिक्षण सभापती अजित नाईक उपस्थीत होते. आज झालेल्या सभेत शनिमांडळ ता . जि . नंदुरबार येथे जिल्हा ग्रामविकास निधी अंतर्गत बहुउद्देशीय इमारत व व्यापारी गाळे बांधकाम करण्यासाठी ५४ लाख ९९ हजार ५४६ निधी मंजुर करण्यात आले.यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी पाणी पुरवठा विभागाचा विषय आल्यावर पदाधिकार्यांनी अधिकार्यांवर फैलावर घेतले. नंदुरबार तालुक्यातील वसलाई येथे झालेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामाच्या भुमिपुजन प्रसंगी फोन करूनही पाणी पुरवठा विभागाचे एकही अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थीत नव्हते.याबाबत कारवाई करावी असे उपाध्यक्ष ऍड.राम रघुवशी यांच्या सह जि.प सदस्यांनी केली.याबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी याबाबत अहवाल बनवुन सादर करतो असे सांगीतले .दरम्यान धडगांव तालुक्यातील तीनसमाळ व अक्राणी तालुक्यातील डेब्रामाळ येथील पाणीपुरवठा योजनेबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकांर्याच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली असुन याबाबत चौकशी अहवाल सादर केला जाईल असे यावेळी रघुनाथ गावडे यांनी सांगीतले.दरम्यान यावेळी सभापती अजित नाईक व जि.प.सदस्य यांनी नवापूर तालुक्यातील प्राथमीक आरोग्य उपकेंद्राच्या ५ ईमारती बांधकाम पुर्ण होवुन ६ विज व पाण्या अभावी पडुन आहेत .याबाबत लवकर कारवाई करण्याची मागणी केली.दरम्यान याबाबत १५ दिवसात टेंडर प्रोसेस होवुन काम पुर्ण होईल असे संबधित अधिकार्याने सांगीतले.यावेळी विविध विभागांचा आढावा घेण्यात आला.