नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबार यांच्याकडे ज्या अर्जदारांनी शैक्षणिक, सेवा,निवडणूक व इतर कारणाकरिता जात पडताळणीचे प्रस्ताव सादर केले आहे. परंतू ज्या अर्जदारांची प्रकरणे त्रृटीअभावी समितीकडे प्रलंबित आहेत. अशा अर्जदारांसाठी त्रृटीची पुर्तता करण्यासाठी 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.
अर्जदारांनी वरील कालावधीत त्रृटीची पुर्तता करुन घ्यावी. सदर कालावधीत त्रृटीची पुर्तता न केल्यास अर्जदारांची प्रकरणे बंद करण्यात येतील. वरील कालावधीत त्रृटीची पुर्तता न केल्यास जात वैधता प्रमाणपत्रासाठी नव्याने अर्ज समितीकडे सादर करावे लागतील.असे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव बी.यु.खरे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.








