म्हसावद l प्रतिनिधी
आज जी.एस.विद्यामंदिर ,कला व विज्ञान वडाळी ता.शहादा येथे राष्ट्रीय कृषी आणी ग्रामिण बँक (नाबार्ड) महाराष्ट्र ग्रामिण बँक 75 आजादी का अमृत महोत्सव “जन संपर्कातुन जन भागीदारी ” आर्थिक व डिजीटल साक्षरता जागृती मेळावा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श.ता.को.आँप एजयूकेशन सोसायटी चे संचालक तथा वडाळी गावाचे पोलिस पाटील गजेंद्रगीर गोसावी,प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य अंबालाल पाटील हे होते.यावेळी विद्यार्थ्यांना अर्थ व वित्तिय संकल्पना बद्दल माहिती देण्यात आली अर्थसंकल्प,वित्तीय तुट,महागाई,अशा विविध विषयांवर अनमोल मार्गदर्शन करण्यात आले त्या सोबतच बँकिंग व्यवहार ,डिजीटल साक्षरता,चेकबुक,इ व्यवहार या बद्दल महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे शाखा अधिकारी मुकेश हेडावू यांनी माहिती दिली.तसेच डिजीटल साक्षरता हि काळाची गरज आहे असे प्रतिपादन गजेंद्रगीर गोसावी यांनी केले. तर डिजीटल साक्षरता आणी सोबत नेट बँकिंग करतांना सायबर सुरक्षा कशी करावी या बद्दल प्राचार्य अंबालाल पाटील यांनी माहिती दिली. महाराष्ट्र ग्रामिण बँकेतर्फे विद्यार्थ्यांना वही,पेन,बिस्किट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे निवेदन व आभार प्रदर्शन जी.एस.विद्यामंदिर माध्यमिक शिक्षक चंद्रकांत रायसिंग यांनी केले तर बँक कर्मचारी किशोर भदाने,शाखा बी.सी.उमेश निकम यांनी कामकाज सांभाळले.