नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र.ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रा.प.बिलमांजरे मौजे किलवनपाडा येथील जगण कांतीलाल गावीत यांच्या शेतापासुन ते स्मशानभूमी पर्यत रस्ता कामाचे भुमीपुजन पं.स सदस्य प्रियंका गावीत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नवापूर तालुका कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत,वनसमिती अध्यक्ष कांतु गावीत,पोलिस पाटील गिरीष मावची,उपसरपंच राहुल गावीत,सदस्य लिला गावीत,,विश्वास गावीत,,फत्या गावीत,,याकुब गावीत,पंडीत गावीत,,सुमन गावीत,यशवंत गावीत,,राघाबाई गावीत,रतनजी गावीत आदि उपस्थित होते.