रोटरी क्लब नंदनगरी व छत्रपती ब्लड फाउंडेशन, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात २८ खाजगी प्राथमिक, नगरपालिका तसेच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व शिक्षिका दात्यांनी रक्तदान केले.
येथील नगरपालिका शाळा क्र.४ मध्ये आयोजित रक्तदान शिबिरात प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.युनुस पठाण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिका प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे, छत्रपती ब्लड फाऊंडेशनचे संस्थापक जीवन माळी व कौटिल्य फाऊंडेशनचे प्रवीण पाटील, रोटेरियन राहुल पाटील हे होते. यावेळी डॉ.पठाण यांनी मनोगतात सांगितले की, राज्यात आणि देशात रक्ताचा तुटवडा सुरू असताना शिक्षक हे रक्तदानासाठी पुढे सरसावले आणि आपल्या रक्तदानातून एखाद्याच्या जीव वाचत असेल तर हे फार पुण्याचे काम आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण चव्हाणव शशिकांत पाटील यांनी केले. प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष मनोज गायकवाड यांनी केले तर आभार सचिव अनिल शर्मा यांनी मानले.