Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ओबीसी समाजास राजकीय आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा, राज्यपालांची विधेयकावर स्वाक्षरी, राज्यातील ओबीसी भटके विमुक्त संघटनांनी केले स्वागत

team by team
February 2, 2022
in राजकीय
0
ओबीसी  समाजास राजकीय आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा, राज्यपालांची विधेयकावर स्वाक्षरी, राज्यातील ओबीसी भटके विमुक्त संघटनांनी केले स्वागत

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याचे ओबीसी कल्याण विभाग मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी, व्हीजेएनटी महामोर्चा, भटके-विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्राच्याच्या पदाधिकाऱ्यानी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत राज्यात ओबीसींना पन्नास टक्क्यांच्या आत राजकीय आरक्षण मिळणार या विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी व महाविकास आघाडी सरकारच्यावतीने राज्यपालांचे आभार मानण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारने ओबीसींना राजकीय आरक्षण ५० टक्क्यांच्या आत देण्यात येईल या स्वरूपाच्या विधेयकावर मागे संपन्न झालेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आले होते. या विधेयकावर दि.१ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्वाक्षरी करून विधेयकास मंजुरी दिली असल्याने विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले आहे. यामुळे आता यापुढे महाराष्ट्र राज्यात ओबीसींना ५० टक्क्यांच्या आत राजकीय आरक्षण मिळण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या ओबीसी, व्हीजेएनटी संघटनांना व महािवकास आघाडी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
याबद्दल महाराष्ट्र राज्याचे ओबीसी कल्याण विभाग मंत्री ना.विजय जी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे, ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चाच्या सुशिला मोराळे, राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके, राष्ट्रीय ओबीसी वकील महासंघाचे ॲड.पुरुषोत्तम पाटील, भटके-विमुक्त हक्क परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.धनंजय ओंबासे, साधना राठोड, भटके-विमुक्त हक्क परिषद युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रतिक गोसावी आदींनी महामहिम राज्यपाल यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन त्यांचे राज्यातील ओबीसी व्हीजेएनटी संघटनांच्यावतीने आभार व्यक्त केले. याप्रसंगी उपरोक्त सर्व पदाधिकार्यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात संवर्गनिहाय अध्यापक आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले होते, ते विधेयक राज्यपालांकडे स्वाक्षरी करिता प्रलंबित आहे. सदर विधेयकास महामहीम राज्यपालांनी त्वरित मंजुरी द्यावी, अशी आग्रही मागणी याप्रसंगी उपस्थितांनी केली, अशी माहिती भटके-विमुक्त हक्क परिषदेचे प्रदेश मुख्य संघटक पुरुषोत्तम वसंत काळे यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्टया जाहीर

Next Post

रांझणी येथील निलेश जाधव यांचे सेट परीक्षेत यश

Next Post
रांझणी येथील निलेश जाधव यांचे सेट परीक्षेत यश

रांझणी येथील निलेश जाधव यांचे सेट परीक्षेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add