नंदुरबार l प्रतिनिधी
येथील लायन्स फेमीना क्लबतर्फे आज मोफत श्रवण (बहीरेपणा) तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.३० जानेवारी २०२२ रविवार रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेदरम्यान येथील डॉ.कल्पेश एम. चौधरी यांचे सद्गुरु स्पीच ॲण्ड हिअरिंग क्लिनिक, अग्रवाल पेट्रोल पंपासमोर, धुळे नाका परिसर, धुळे रोड, नंदुरबार येथे नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव व प्रथमच बहिरेपणा व बोबडेपणा व्यक्तींसाठी निदान व उपचारासाठी मोफत श्रवण (बहिरेपणा) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात कमी येकु येणे व न येकु येणे (जन्मत: जन्मानंतर व वयानुसार जेष्ठ नागरिकांना ऐकण्याचा ञास), ऑपरेशन करुन सुद्धा न ऐकु येणे, बोलण्यातील समस्या (वाचा दोष) बोबडेपणा, तोतरेपणा, बोलतेवेळी अटकने, फाटलेले ओठ, नाकातुन आवाज येणे, कानातुन शिटी सारखा आवाज येणे, मशिन लावुन सुद्धा ऐकु न येणे आदी समस्यांवर निदान व उपचार करण्यात येतील. या शिबिराचा गरजूंनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी ९२८४९४९३६८, ९२८४९४७४८१, ७०२१५५२१२५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लायन्स फेमिना क्लबतर्फे करण्यात आले.