तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील रांझणीसह पांच शिवार परिसरातील शेतकऱ्यांच्या वापर असलेल्या रस्त्याचा कामाला सुरुवात व्हावी अशी मागणी आमदारांकडे निवेदनात शेतकऱ्यांनी केली आहे.
तळोदा तालुक्यातील रांझणी परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार राजेश पाडवी यांची भेट घेत निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, तळोदा तालुक्यातील रांझणी, रोझवा, नवागांव, चिनोदा व प्रतापपुर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतशिवारात शेतमाल वाहून नेण्यासाठी तसेच नेहमी वर्दळ असलेल्या रोझवा रस्तावरील जय हनुमान मंदिर ते शिव रस्ता सरळ चिनोदा रस्त्याला मिळणारा रस्त्या पानंद रस्त्यातून होणार आहे आपण आमदार राजेश पाडवी यांच्या विकास निधीतून निधी उपलब्ध करून दिला आहे. तरी आपण लक्ष घालावे हा रस्ता काम करण्यासाठी लक्ष घालावे अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदन दीपक गवळी, संजय पाडवी, काशिनाथ मराठे, दिनेश पाचोरे, देविदास मराठे, कांतीलाल मराठे आदी शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले आहे.