नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण विभाग मुंबई, यांच्या अंतर्गत देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील युवकांमध्ये एच.आय.व्ही एड्स बाबत जनजागृती व्हावी याकरिता नंदुरबार जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे ऑनलाइन उपप्रादेशिक क्विज कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी रीया वासवानी व अलीना पराईल यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.या स्पर्धेत 4 राज्यांनी सहभाग घेतला ,महाराष्ट्र, गुजरात, दिव दमण- दादरनगर आणि मुंबई .यामध्ये शाळेतील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत द्वितीय क्रमांक व 10 हजार रुपये पारितोषिक पटकावले. विद्यार्थीनी पुढे होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.