Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारा : सनातन संस्था

team by team
January 28, 2022
in राजकीय
0
सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारा : सनातन संस्था

नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकाने यांमध्ये वाईन विक्री करता येईल, असा निर्णय घेतला आहे. या समाजघातक निर्णयाचा सनातन संस्था जाहीर निषेध करते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी शेकडो संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि सहस्रो मावळ्यांच्या पराक्रमाने पुनीत झालेली भूमी मद्यप्यांची भूमी म्हणून म्हटली गेल्यास त्याचे पातक सरकारला लागेल. सुसंस्कृत महाराष्ट्राला काळिमा फासणारा हा निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा, अशी मागणी सनातन संस्थेने केली आहे.
पंजाबमधील युवापिढी पूर्णपणे व्यसनाधीन झाली आहे, त्यावर ‘उडता पंजाब’सारखा सिनेमाही आला. हे वास्तव पहाता महाराष्ट्राने सजग होऊन खरेतर राज्य ‘दारूमुक्त’, ‘व्यसनमुक्त’ होण्यासाठी सरकारने पावले उचलायला हवीत. इथे मात्र वाईन सहजासहजी उपलब्ध करून आपण मद्यपिण्यास प्रोत्साहनच देत आहात. आधीच राज्यातील महिला आणि बालके दारुड्या पती आणि वडील यांच्या अत्याचारांनी पीडित आहेत. या निर्णयामुळे हे अत्याचार वाढीस लागून त्याचे पाप सरकारच्याच माथी लागेल. अथर्ववेद, महाभारत, मनुस्मृती आदी अनेक धर्मग्रंथात मद्यपान हे महापाप सांगितले आहे. त्याला प्रोत्साहन हेही महापापच ठरेल. त्यामुळे सरकारने हा समाजद्रोही आणि धर्मद्रोही निर्णय त्वरित मागे घ्यावा, असे संस्थेने म्हटले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

लोंजाफळी बेडकी दादरी फळी रस्त्याच्या कामाबाबत अधिकारी व पदाधिकाऱ्याचा खुलासा, कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह कायम

Next Post

तळोदा येथे निलंबित कंडक्टरने सुरु केले भोजनालय

Next Post
तळोदा येथे निलंबित कंडक्टरने सुरु केले भोजनालय

तळोदा येथे निलंबित कंडक्टरने सुरु केले भोजनालय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add