नंदूरबार l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील झामणझर ग्रामपंचायत अंतर्गत लोंजाफळी बेडकी दादरीफळी दरम्यान झालेल्या रस्त्याच्या कामाबाबत येथील नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर बांधकाम विभागाचे अधिकारी व सरपंच जिल्हा परिषद सदस्य यांनी खुलासा केला आहे. सदर रस्त्याचे काम स्थानिक आमदार विकास कार्यक्रम अंतर्गत 15 लक्ष अंदाजीत रकमेमध्ये 4 किलोमीटर 400 मीटर पैकी फक्त 625 मीटर मंजूर असलेले काम करण्यात आल्याचे माहिती बांधकाम अभियंता डी.एम. गावीत यांनी दिली आहे.
या कामाच्या मक्तेदारीत सरपंच, ग्रामसेवक ग्रामपंचायत झामणझर यांनी केला असून रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेचा अहवाल राज्य गुणवत्ता निरीक्षक प्रदीप विठ्ठल महाजन व उपस्थित अभियंता एस.एस. गावित व डी.एम. गावित यांनी रस्त्याचे काम चांगले असल्याचा अहवाल दिलेला आहे. मात्र मक्तेदारी दुसऱ्याचे आणि ठेकेदारी काम दुसऱ्याचे याच्यात रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
जिल्हा परिषद सदस्य राया मावची यांनी तर सदर काम तक्रारदारांनी पंधरा लाख रुपयांमध्ये करून दाखवावे आम्ही त्यांचा सत्कार करू असे आव्हान केले आहे.