Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कापुस पिकावरील किडींचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन

team by team
July 16, 2021
in कृषी
0
नंदुरबार ! प्रतिनिधी
 कपाशी पिकावर सुरूवातीच्या काळात प्रामुख्याने मावा आणि तुडतुडे ह्या रसशोषक कीडीचा प्रादुर्भाव आढळुन येत असल्याने शेतकऱ्यांनी कापुस पिकावरील मावा व तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
 
कीडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकाचे सर्वेक्षण करावे. प्रादुर्भावग्रस्त फांद्या, पाने इतर पालापाचोळा जमा करुन किडींसहित नष्ठ करावे. शेतात वेळेवर आंतरमशागत करुन पीक तणविरहीत ठेवावे. किडीचे पर्यायी खाद्य  तणे जसे अंबाळी, रानभेंडी इत्यादी नष्ट करावीत. मृद परिक्षणाच्या आधारावर खत मात्रेचा अवलंब करुन दोन ओळीतील व दोन झाडातील अंतर योग्य ठेवावे आणि जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा, जेणेकरुन कपाशीची अनावश्यक कायीक वाढ होणार नाही आणि पीक दाटणार नाही. 
 
बीटी कपाशीच्या बियाण्याला इमिडाक्लोप्रिड किंवा थायोमेझोक्साम किटकनाशकांची बिज प्रक्रिया  केलेली असते. त्यामुळे रस शोषक कीडींपासून सर्वसाधारण 2 ते 3 आठवड्यापर्यंत  पिकास संरक्षण मिळते त्यामुळे या काळात किटकनाशकाची फवारणी करु नये.
 
रस शोषक किडीवर उपजिविका करणारे नैसर्गिक किटक उदा. सीरफिड माशी, कातीन, ढालकिडे, क्रायसोपा,ॲनॅसयीस प्रजातीचा परोपजीवी किटक संख्या पुरेशी आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकचा वापर करु नये.  प्रादुर्भाव जास्त असल्यास रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा ॲझाडीरेक्टिन 0.03 टक्के निंबोळी तेल आधारित डब्ल्युएसपी 30 मिली किंवा ॲझाडीरेक्टिन 5 टक्के (डब्ल्युडब्ल्युएनएसकेई) 20 मिली किटकनाशकाची फवारणी करावी. 
 
वरिल सर्व उपाययोजना अवलंब करुनही किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्याचे आढळुन आल्यास  बुप्रोफेजीन 25 टक्के प्रवाही 20 मिली, डॉयर्फेथ्युरॉन 50 टक्के पाण्यात मिसळुन भुकटी 12 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फलेनिकमाईड 50 टक्के डब्ल्युपी 3 ग्रॅम किंवा ॲसिटामिप्रीड 20 एसपी 1 ग्रॅमची यापैकी एक रासायनिक किटकनाशक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रत्येक फवारणीला एकच किटकनाशक न वापरता आळीपाळीने त्यांचा वापर करावा असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नंदुरबार यांनी कळविले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बांधकामास प्रशासकीय मान्यता

Next Post

नवापूर सिमा तपासणी नाक्यावर सव्वा दोन लाखाच्या गुटख्यासह ९ लाखाचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

Next Post
नवापूर सिमा तपासणी नाक्यावर सव्वा दोन लाखाच्या गुटख्यासह ९ लाखाचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

नवापूर सिमा तपासणी नाक्यावर सव्वा दोन लाखाच्या गुटख्यासह ९ लाखाचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add