Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा शहरात विनापरवानगी मिरवणूकीबाबत तीन वेगवेगळे गुन्हे दाखल

team by team
January 10, 2022
in क्राईम
0

नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा शहरात विना परवानगी मिरवणूक काढून कोराना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात जमावा विरूद्ध तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा शहरातील भाऊतात्या पेट्रोल पंप व जुने शहादा प्रवेशद्वारादरम्यान विना परवानगी मिरवणूक काढण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत डीजे लावून ध्वनीप्रदूषण करीत आरडाओरड करुन फटाके फोडत जल्लोष करुन शांततेचा भंग करण्यात आल्याच्या आरोपावरुन शहादा तहसील कार्यालयाचे मंडळाधिकारी तथा कोव्हीड भरारी पथकाचे अधिकारी शिरीषचंद्र गोटू परदेशी यांच्या फिर्यादीवरुन शहादा
पोलिस ठाण्यात मकरंद नगीन पाटील, अभिजीत मोतीलाल पाटील, अनिल भिमराव भामरे, निलेश दत्तात्रय पाटील, सरजू साहेबराव पाटील, रमाशंकर माळी, राजा ऊर्फ राजेंद्र दिलीप माळी, संजय चौधरी, अरविंद कुवर, किशोर साहेबराव पाटील, मुनेश जगदेव, गणेश रघुनाथ पाटील, सागर मगन मराठे, राजेंद्र अग्रवाल, सुनिल काशिनाथ पाटील, सुनिल पाटील, विनोद जैन, पंकज सोनार, संतोष वाल्हे, गोपाल गांगुर्डे, विजय पाटील, सुरेंद्र कुवर, हितेंद्र वर्मा, रुपेश कोळी, कार्तिक नाईक, कैलास युवराज सोनवणे, शिवाजी मोतीराम पाटील, श्याम जाधव, शुभम चौधरी, लाला पाटील, वैभव तांबोळी, मनिष चौधरी, दिनेश नेरपगार, सोनू पाटील, अप्पू पाटील, गुड्डू पवार, आदित्य डोडवे, सतिष मराठे, बबलू फेटेवाला यांच्यासह १०० ते १२५ जणांविरोधात भादंवि कलम १८८, २६८, २६९, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन कलम १३५, ११२, ११७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ बी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक माया राजपूत करीत आहेत. तर याप्रकरणी दाखल दुसऱ्या गुन्ह्यात शोभायात्रेत आर- १ साउँड डी. जे. वाहन क्र (एमएच ०६ एजी ५२६५) च्या मागील बाजुस आसलेल्या स्पीकरवर वैभव तांबोळी व गुड्डू पवार यांच्यासह इतर दोन असे चौघेजण हातात तलवार घेवून विचित्र हावभाव हातवारे करत होते. या चौघांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदीचा आदेश उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांतर्फे कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी शहादा पोलिसात पोकॉ. भरत पुंडलीक उगले यांच्या फिर्यादीवरून वैभव तांबोळी, गुड्डू पवार यांच्यासह इतर दोन अशा चौघांवर भारतीय हत्यार कायदा कलम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोना. किरण पावरा करत आहे.दरम्यान, याप्रकरणी तिसरा गुन्हा दाखल झाला असून शोभायात्रेदरम्यान शहरात विविध ठिकाणी पाणी व अल्पोपहाराची स्टॉल लावून गर्दी केल्याप्रकरणी तसेच जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी विविध स्वयंसेवी संस्थांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शहरातील स्वयंसेवी संस्था व विविध संघटनांच्यावतीने शोभायात्रेत उपस्थित राहणाऱ्या नागरिकांसाठी पाणी व अल्पोपहाराचे स्टॉल लावले होते. या स्टॉलमुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचा तसेच राज्य शासनाच्या ३१ डिसेंबरच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलीस नाईक मणिलाल पाडवी यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र अग्रवाल, भुषण रामराजे, अक्षय छाजेड, बियर बार असोशिएशन, राहुल जैन, संतोष महाजन, पिनाकीन पटेल, मकरंद पाटील, आदित्य डोडवे, रुपेश राजपुत, साची गुजराती यांच्यासह काही संघटनेच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

भरत माणिकराव गावित यांच्या गाडीचा झाला अपघात, सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत नाही

Next Post

रोगराई पासून भावी पिढीला दूर ठेवायचे असेल शेतकऱ्यांनी विषमुक्त शेतीची कास धरा : गणेश आबासाहेब मोरे

Next Post
रोगराई पासून भावी पिढीला दूर ठेवायचे असेल शेतकऱ्यांनी विषमुक्त शेतीची कास धरा : गणेश आबासाहेब मोरे

रोगराई पासून भावी पिढीला दूर ठेवायचे असेल शेतकऱ्यांनी विषमुक्त शेतीची कास धरा : गणेश आबासाहेब मोरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add