Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

परिवहन महामंडळाच्या सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्त माजी चालकांना मानधनावर घेण्याचा निर्णय

team by team
January 7, 2022
in राज्य
0

नंदूरबार l प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यातील सर्वच कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे लालपरीची चाके थांबली होती. अखेर एसटीतून सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या माझी चालकांना वयाच्या 62 वर्षा पर्यंत मासिक मेहनतानावर  घेण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे.यामुळे  लवकरच एसटी सुरू होऊन सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी राज्यातील सर्व विभागीय नियंत्रक यांना पाठवलेल्या पत्रात याबाबत आदेश पारित केले आहेत. या आदेशात म्हटले आहे की दिनांक 27 ऑक्टोंबर2021 पासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपात चालक-वाहक समाविष्ट झाल्यामुळे दैनंदिन वाहतुकीवर परिणाम होत आहे. राज्यातील प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी याकरिता एसटी महामंडळ आतून सेवानिवृत्त झालेले आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या माजी चालकांना वयाच्या 62 वयापर्यंत सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मासिक मेहनताना 20000 रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले असून बडतर्फ आणि निलंबित कर्मचाऱ्यांना करारबद्ध न करण्याचा देखील आदेशात म्हटले आहे. एस टिच्या नवीन निर्णयानुसार माजी चालकांना सेवेत घेण्यापूर्वी त्यांची लेखी संमती पत्र लिहून घेण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या अटी आणि शर्ती यांना अधीन राहून माजी चालकांना सेवेत घेण्यात येणार आहे. या सेवेदरम्यान मासिक मानधनाव्यतिरिक्त कुठलेही भत्ते आणि सुविधा उपलब्ध होणार नसल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे. मासिक मेहनतानावर करारबद्ध केलेल्या चालकाच्या माध्यमातून कमी अंतराच्या फेऱ्या सुरू करण्याचे आदेश विभागीय नियंत्रकांना देण्यात आले आहेत. परिवहन महामंडळाच्या या निर्णयामुळे गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेल्या एसटी पुन्हा रस्त्यावर धावण्याची शक्यता असल्याने प्रवासी वर्गांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

भालेर येथील शिवदर्शन विद्यालय व क. महाविद्यालयात “मासिक पाळी व्यवस्थापन” विषयावर ऑनलाईन व्याख्यान

Next Post

ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना ७५ टक्के व ८० टक्के अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी उपलब्ध : कृषि मंत्री दादाजी भुसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add