नंदुरबार ! प्रतिनिधी
अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी युरीया खतांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणीचे निवेदन कृषी मंत्री दादाजी भुसे यांना शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांनी दिले.
या निवेदनात म्हटले आहे की,अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात ८० टक्के शेतजमीन कोरडवाहू असून या जमिनीला युरिया खताची आवश्यकता असते . मात्र कंपनी कडून मिश्र खत वापरण्यासाठी दबाव टाकले जाते . जर शेतकऱ्यांनी मिश्र खत वापरले नाही तर त्यांना युरिया खत दिले जात नाही खतांचे व्यापारी सुद्धा अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खत देत नाहीत . वास्तविक करोडवाहू जमिनीसाठी मिश्र खत काहीही कामाचे नाही . अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात नेहमी युरिया खताचा तुटवडा असतो म्हणून आपल्या स्तरावरून आपण युरिया खताचा मुबलक साठा उपलब्ध करावा अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांनी केली आहे.