नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात जुलै महिन्याचे ९ दिवस ओलटुनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जिल्हयात विरचक धरणात ४३ टक्के पाणीसाठा आहे. तर शहादा तालुक्यातील दरा मध्यम प्रकल्पात ५७ टक्के, नवापूर-नागन प्रकल्प ४३ टक्के, नवापूर कोरडी प्रकल्पात २३ टक्के एवढाच पाणीसाठा आहे. तर जवळपास ६ धरणे कोरडे पडले आहेत.
जुलै महिन्याचे ९ दिवस ओलटुनही जिल्ह्यात समाधान कारक पावसाची प्रतीक्षा असे असले तरी नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणार्या शिवण मध्यम प्रकल्पात अर्थात विरचक धरणात ४३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहराला पिण्याची पाण्याची टंचाई भासणार नाही. मात्र अन्य धरणाची स्थिती चिंताजनक आहे. धरणात कमी पाणी साठा शिल्लक असल्याने सर्वांनाच पावसाची प्रतिक्षा आहे. तर दरा, नागन प्रकल्प वगळता ६ छोटया धरणांनी तळ गाठला आहे.
जून महिन्यात दोन तीन वेळा पावसाने तुरळक अशी हजेरी लावली. त्यामुळे जिल्हयातील धरणांची स्थिती चिंताजनक आहे. दोन दिवसात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
जिल्हयात विरचक धरणात ४३ टक्के पाणीसाठा आहे. तर शहादा तालुक्यातील दरा मध्यम प्रकल्पात ५७ टक्के, नवापूर-नागन प्रकल्प ४३ टक्के, नवापूर कोरडी प्रकल्पात २३ टक्के एवढाच पाणीसाठा आहे. ढोंग ता.नवापूर येथील छोटे धरण, चिरडा (ता.शहादा), धनपूर (ता.तळोदा) शुन्य टक्के पाणी आहे. तीच परिस्थिती नंदुरबारच्या घोटाणे, शहादा तालुक्यातील सुसरी, बलदाणे येथील अमरावतीची स्थिती आहे. नवापूरच्या नेसूमध्ये केवळ २८ टक्के तर भूरीवेल लघुपाट योजनेत केवळ २० टक्केच पाणी आहे. जवळपास ६ धरणे कोरडे पडले आहेत. तर सुसरी, दरा व विरचक या ३ मध्यम प्रकल्पात समाधानकारक साठा आहे. दरम्यान, यंदा ३८.६४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. भात व कापूस लागवड ४३ टक्क्यांवर पोहचली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात केवळ ६८.५० मिमी पाऊस झाला आहे. जून मध्ये सरासरी ४४ टक्केच पाऊस झाला आहे. शेतकर्यात चिंता व्यक्त होत आहे. राज्यात सर्वात कमी पाऊस नंदुरबार जिल्ह्यात झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी तुरळक पाऊस पडला. दिवसभर उकळत होते. शहरातील निम्म्या भागात तुरळक पाऊस तर निम्म्या भागात पाऊस पडला नाही.