Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ग्रामसेवकाचा कार्यभार सोपविल्याचा राग आल्याने सरपंच, उपसरपंचांची गटविकास अधिकार्‍यांशी हुज्जत

गटविकास अधिकार्‍यांनी मागितले पोलीस संरक्षण

team by team
June 22, 2021
in राजकीय
0

अक्कलकुवा | प्रतिनिधी-

अक्कलकुवा  ग्रुप ग्रामपंचायतीचा कार्यभार ग्रामसेवक आर.आर.वळवी यांच्याकडे दिल्यामुळे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी धमकी देवून विविध आरोप केल्यामुळे पंचायत समितीत कार्यरत असेपर्यंत गटविकास अधिकार्‍यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.
अक्कलकुवा गृपग्रामपंचायतीच्या कारभारासंदर्भात काही महिन्यांपासून विविध प्रकारचे आरोप व प्रत्यारोप होत आहेत. नव्याने आलेले प्रभारी गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी ग्रामसेवक आर.आर.वळवी यांच्याकडे सदर ग्रामपंचायतीचा कार्यभार सोपवण्याचे आदेश दिले. मात्र, सरपंच व उपसरपंच व सदस्यांनी गटविकास अधिकार्‍यांशी हुज्जत घातल्याने स्वरक्षणासाठी गटविकास अधिकार्‍यांनी पोलिस संरक्षण मागविले आहे.
अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायत संदर्भात प्रभारी गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी माहिती सविस्तरपणे जाणून घेतली. याठिकाणी नेमणूक असलेल्या महिला ग्रामसेविका यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला  असता कार्यभार जास्त होत असल्याने त्यांच्याजागी  ग्रामसेवक आर.आर.वळवी यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात आला.  ग्रामपंचायतीकडून त्यांना पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने अक्कलकुवा पंचायत समितीला तशी माहिती कळवण्यात आली. या संदर्भात गट विकास अधिकार्‍यांनी अक्कलकुवा ग्रामपंचायतीला वेळोवेळी नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे ग्राम पंचायतचे सरपंच, उपसरपंच, इतर सदस्यांना राग आल्याने अक्कलकुवा पंचायत समितीचे गट विकास अधिकार्‍यांच्या दालनात घुसून त्यांच्याशी हुज्जत घालण्यात आली. त्यामुळे  गटविकास अधिकार्‍यांनी संबधित घटना पोलीस ठाण्यात कळवली. तत्त्काळ पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. जिवाला धोका होवू नये यासाठी श्री.सूर्यवंशी यांनी पोलिस अधीक्षक व अक्कलकुवा पोलिस निरीक्षक यांच्याकडे यांच्याकडे स्वसंरक्षण करिता पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. याबाबत पत्रकार परिषद घेवून गटविकास अधिकार्‍यांनी माहिती दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

रामपूर येथे शेतीच्या हिस्सेवाटणीवरुन तिघा भावांनी केला भावाचा खून वडील,जखमी

Next Post

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीतर्फे तळोदा तालुक्यातून २० हजार पोस्टकार्ड पंतप्रधानांना पाठविणार

Next Post
मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीतर्फे तळोदा तालुक्यातून २० हजार पोस्टकार्ड पंतप्रधानांना पाठविणार

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीतर्फे तळोदा तालुक्यातून २० हजार पोस्टकार्ड पंतप्रधानांना पाठविणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add