नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबारच्या नगराध्यक्षा सौ.रत्नाताई रघुवंशी या एक महिन्याच्या रजेवर गेल्याने उपनगराध्यक्ष रवींद्र अशोक पवार यांच्याकडे प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार सोपविण्यात आला आहे .
नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.रत्नाताई रघुवंशी या खाजगी कामानिमित्त दि.२३ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीकरिता रजेवर गेल्या आहेत . त्यांच्या रजा कालावधीतील नगराध्यक्षपदाचा पदभार उपनगराध्यक्ष रवींद्र पवार यांच्याकडे सोपविण्यात आला असून , मंगळवारी दुपारी त्यांनी पदभार घेतला . यावेळी विषय समिती सभापती कैलास पाटील , मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते .रवींद्र अशोक पवार यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला नंतर अनेक मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला.








