अक्कलकुवा l प्रतिनिधी
खापर ता. अकक्लकुवा येथील महावीर गौशाळा ट्रस्ट संचलित गौशाळेत आज पशुचिकित्सालयाचे भूमिपुजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यावेळी उपस्थित जनसमुदाया कडून आपापल्या स्वर्गवासी पूर्वजांच्या स्मारणार्थ काहिना काही रक्कम भेट देत असल्याचे जाहिर करत होते.योगायोगाने आज शिवसेना प्रमुख हिन्दुह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे देखील स्मृतिदिन होता.आणि ते देखील सर्व शिवसैनिकांचे कुटुंब प्रमुख आहेत अशी सामान्य शिवसैनिकाची भावना आहे. म्हणून स्व. ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधुन कार्यक्रमात उपस्थित असलेले युवासेनेचे नंदुरबार जिल्हाप्रमुख ललित जाट यांनी गौशाळा ट्रस्टच्या योजने नुसार माजी आ. चंद्रकांत रघुवंशी व शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांच्याशी चर्चा करुन सदर पशुचिकित्सालयाच्या रजत स्तंभचे लाभार्थी म्हणून स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त युवासेनेच्या वतीने 31 हजाराची भेट देत धनादेश दिला. सदर धनादेश महावीर गौशाळेचे प्रेरक आणि मार्गदर्शक,खापर चे माजी सरपंच तथा जैन संघाचे माजी अध्यक्ष मोहनलाल जैन व महावीर गौशाळा ट्रस्टचे चेअरमन लुनकरण भंसाली यांनी ललित जाट यांच्या हस्ते धनादेश स्वीकारला.तसेच ललित जाट यांनी स्वताच्या आजीच्या स्मरणार्थ देखील ३१ हजाराची भेट देत रजत स्तंभाचे लाभार्थी झाले.यावेळी खापर गावातील विविध क्षेत्राचे नामांकित पदाधिकारी, लोकप्रतिनिधि, ग्रामस्थ तथा जैन समाजाचे महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. जाट परिवाराचा सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात नेहमी सहभाग असतो. त्याच पार्श्वभूमीवर आज गौशाळेच्या चांगल्या कार्यात सहभागी होता आले याबद्दल ललित जाट यांनी समाधान व्यक्त केले.








