नंदुरबार l प्रतिनिधी
सातपुडा पर्वतातील सर्वात उंचं अस्तंबा शिखरावर पहिल्यांदा तिरंगा ध्वज पडकला. त्याचे कारण ही तसेच आहे. आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे हे दोन महिन्यानंतर द अमेरिका मध्ये असलेले सर्वात उंच शिखर mount Aucoungoa सर करण्यासाठी मोहिमेवर जाणार आहेत.त्याआधी त्यांनी अस्तंबा ऋषीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.त्या ठिकाणी त्यांनी तिरंगा ध्वज पडकवला.
सातपुडा पर्वत रांगेतील अक्कलकुवा तालूक्यातील ‘बालाघाट’ या अतिशय दुर्गम लहान खेड्यातील आदिवासी समाजातील पहिला नवयुवक अनिल वसावे यांने कोरोना काळानंतर युरोपातील सर्वोच्च शिखर ‘माऊंट एलब्रूस’ सर करून विश्वविक्रम केला होता. कोरोना काळात जगात सुरू झालेल्या पर्वत आरोहण मोहिमेतील अनिल वसावे हा भारतातून गेलेल्या गिर्यारोहकांमधून पहिला आदिवासी समाजाचा प्रतिनिधी ठरला होता.
अनिल वसावे यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले की, हे ध्येय त्याने अत्यंत कठीण परिस्थितीत गाठले असून आजवर त्याने 2021 मध्ये केलेली ही दुसरी आंतरराष्ट्रीय मोहीम आहे. 26 जानेवारी 2021 रोजी ही अनिल वसावे याने आफ्रिका खंडातील माऊंट किलीमांजारो हे शिखर सर केले होते. 8 जुलै,2021 मध्ये एकाच वर्षी 2 आंतरराष्ट्रीय मोहिमा अंमलात आणताना युरोपातील सर्वोच्च शिखर सर करणाऱ्या टीम चे नेतृत्व ही करायला मिळणे ही खरी तर प्रचंड अभिमानाची गोष्ट होती. ही कामगिरी करताना अनिल वसावे याला एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभले असून येणाऱ्या काळात 7 ही खंडातील 7 सर्वोच्च शिखरे सर करण्याचा त्यांचा मानस आहे,
आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे हे दोन महिन्यानंतर द अमेरिका मध्ये असलेले सर्वात उंच शिखर mount Aucoungoa सर करण्यासाठी मोहिमेवर जाणार आहेत.त्याआधी त्यांनी सातपुडा पर्वतातील सर्वात उंचं अस्तंबा शिखर सर करत अस्तंबा ऋषीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला.त्यानंतर तेथे तिरंगा ध्वज पडकवला.