Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आरोग्य कर्मचारी महासंघाने जि. प. प्रशासनाला दिला बेमुदत उपोषणाचा ईशारा कालबद्ध पदोन्नती व पदोन्नती लागू करण्याची मागणी

team by team
November 2, 2021
in आरोग्य
0

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना गेल्या १२ वर्षांपासून शासन नियमाप्रमाणे लागू असलेली कालबद्ध पदोन्नती व पदोन्नती लागू न केल्याने तसेच इतर मागण्यांसाठी आरोग्य कर्मचारी महासंघाने जि. प. प्रशासनाला बेमुदत उपोषणाची व धरणे आंदोलनाची नोटीस दिली.
जि प आरोग्य विभागातील सर्व संवर्गातील आरोग्य कर्मचार्‍यांना तब्बल एक तपापासून म्हणजेच १२ वर्षांपासून शासन निर्णयाप्रमाणे देय असलेली कालबद्ध पदोन्नती व पदोन्नतीचा लाभ तसेच सन २००५ पासून डिसीपीएस/एनपीएस धारक कर्मचार्‍यांना त्यांच्या जमा रक्कमेचा हिशोब देण्यात येत नाही, यातील असलेला घोळ दूर होण्याची आवश्यकता आहे. तसेच प्रॉव्हिडंट फंड धारक कर्मचार्‍यांना त्यांच्या खात्यात जमा असलेल्या रक्कमेचा २-३ वर्षापासून हिशोबाच्या पावत्या दिलेल्या नाहीत. यापूर्वी ज्यांना पावत्या देण्यात आल्या त्यांच्या हिशोबाचा ताळमेळ लागत नाही, ज्यांनी प्रॉव्हिडंट फंडातून कर्ज घेतले नाही त्यांच्या खात्यावर कर्ज दाखविण्यात येतात, वेतन देण्याच्या कायद्यानुसार दरमहा १ तारखेला पगार होणे आवश्यक असतांना देखील पगार २० तारखेनंतरच केले जातात, रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशी तसेच सणासुदीला आरोग्य कर्मचार्‍यांकडून सक्तीने कामे करून घेणे तसेच कोविड लसीकरणाच्या नावाखाली वेळीअवेळी कर्मचार्‍यांची होत असलेली मुस्कटदाबी, लसीकरणाच्या ठिकाणी नर्सेस भगिनींच्या सुरक्षतितचे काय ?
या व इतर मागण्यांसाठी गेल्या १ वर्षापासून महासंघ मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना वारंवार भेटून, विनंती करून, निवेदने देऊनही त्यांनी प्रत्येक वेळेस आश्वासने दिलीत पण प्रत्यक्षात एकही आश्वासन पाळण्यात आलेले नाही. कर्मचार्‍यांना न्याय नाकारण्याचीच भूमिका प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.
एकंदर अशा प्रकारामुळे कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याने जिल्ह्यातील आरोग्य कर्मचार्‍यांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी खासदार हिनाताई गावित व महासंघाला ठोस आश्वासन दिल्याने २३ ऑगस्ट पासूनचे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. त्यावेळेस देखिल दिलेले आश्वासन न पाळल्याने महासंघाने इशारा दिल्याने दि.२८ ऑक्टोबर  २०२१ ही तारीख आरोग्य कर्मचार्‍यांना न्याय देण्याची अंतिम तारीख  मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महासंघाला दिली होती.
परंतु दि.२८ तारखेला देखील कर्मचार्‍यांना न्याय मिळालेला नसल्याने महासंघाचे अध्यक्ष हर्षल मराठे यांनी जि. प. प्रशासनाला दि.१० नोव्हेंबर २०२१ पासून नंदुरबार जिल्हापरिषदेसमोर आरोग्य कर्मचारी बेमुदत उपोषण करतील व धरणे आंदोलन करतील अशी नोटीस दिली.
१० नोव्हेंबर पासूनचे आरोग्य कर्मचार्‍यांचे आंदोलन हे अंतिम, निर्णायक व ऐतिहासिक असल्याने महासंघाचे अध्यक्ष हर्षल मराठे हे स्वतः बेमुदत उपोषणाला बसणार आहे. कालबद्ध पदोन्नती व पदोन्नतीचे तसेच इतर मागण्यांचे आदेश हातात घेतल्याशिवाय उपोषणाची  सांगता होणार नाही असे चिटणीस सतीश जाधव यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

शेतकरी-सभासदांनी अपप्रचाराला बळी पडू नये; सातपुडा पूर्णक्षमतेने सहा लाख टन ऊस गाळप करणार : दीपक पाटील

Next Post

शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add