नंदुरबार | प्रतिनिधी
डॉ. हेडगेवार सेवा समिती कृषि विज्ञान केंद्र संचलित रेडीओ विकास भारती ९०.८ एफ.एम या केंद्राचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांचे हस्ते करण्यात झाले. नंदुरबार जिल्ह्यातील हे पहिल्या कम्युनिटी रेडीओ केंद्र आहे.
यावेळी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनिषा खत्री, नाबार्डचे सहाय्यक महाव्यवस्थापक प्रमोद पाटील, यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ. हेडगेवार सेवा समितीचे सचिव डॉ. नितीन पंचभाई यांनी डॉ. हेडगेवार सेवा समितीच्या ग्रामीण, कृषि तसेच सामाजिक कार्याचा आढावा घेत कम्युनिटी रेडीओ केंद्राची आवश्यकता विषद केली.
कम्युनिटी रेडीओ केंद्राची सविस्तर माहिती देताना कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांनी कम्युनिटी रेडीओ कृषि तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी जिल्ह्यातील शेतकर्यांना उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
शेतकर्यांना कृषि विकासासाठी आधुनिक ज्ञान देतानाच शेतक-यांकडे असलेले ज्ञान जोपासण्यासाठी सुध्दा या रेडीओ केंद्राचा उपयोग होईल. त्यातून कृषि विकासाचे टप्पे लवकर गाठणे साध्य होईल असे प्रतिपादन चार्टर्ड अकाऊटंट श्री. प्रकाश पाठक यांनी केले.
याप्रसंगी नाबार्डचे सहाय्यक महाव्यवस्थापक प्रमोद पाटील म्हणाले की कृषि विज्ञान केंद्राची शेतक-यांप्रति असलेली आत्मीयता, आपुलकी वाढविण्यासाठी या सामुदायीक रेडीओ केंद्राचा उपयोग होईल आणि कृषि विज्ञान केंद्र हे शेतकर्यांसाठी ठरेल असे सांगीतले.
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी पीक विमा, पीक कर्ज यासारख्या शासनाच्या कृषि विषयक योजना तत्परतेने शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी रेडीओ विकास भारती चा उपयोग होईल. तसेच शेतकर्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान हवामानाचा अंदाज तसेच बाजारभाव अधिक जलद गतीने प्रसाद करता येणे शक्य होईल. त्यामुळे शेतकर्यांनी या रेडीओ केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे सांगितले.
कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञान, तंत्रज्ञाच्या शिफारशीचा लाभ दुर्गमभागातील शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सदर रेडीओ केंद्र उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन कृषि महाविद्यालय, नंदुरबारचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. बी. खरबडे यांनी केले.
ऑनलाईन संदेश देताना कृषि विज्ञान केंद्राच्या महाराष्ट्र, गुजरात, गोवा या तीन राज्याचे अटारी, पुणे चे संचालक डॉ. लाखनसिंग यांनी कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबारच्या कार्याचे कौतुक करीत रेडीओ विकास भारती ची कृषि विस्ताराच्या कार्यात महत्वाची भूमिका असेल. त्यातून जिल्ह्याच्या कृषि विकासाला चालना मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
नंदुरबारच्या खा.डॉ. हिना गावित यांनी नंदुरबार जिल्ह्यातील पहिल्या रेडीओ केंद्राला ऑनलाईन पद्धतीने शुभेच्छा देताना जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, कृषि तसेच आरोग्य विकासासाठी हे केंद्र चालना देणारे ठरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. ई. वायुनंदन, कुलगुरू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांनी रेडीओ विकास भारती या सामुदायिक रेडीओ केंद्राव्दारे जिल्ह्यातील कर्तबगार व्यक्ती, त्यांच्या यशोगाथा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. बदलत्या हवामानाच्या काळात शेतक-यांना हवामानाचा अचूक अंदाजासोबतच कृषिसल्ला वेळेत पोहोचविणे शक्य होणार आहे. या रेडीओ केंद्राव्दारे माध्यमातून मिळणार्या ज्ञानातून विकासाला गती प्रप्त होईल असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात कृष्णदास पाटील यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरीता जास्तीत जास्त लोकांनी कम्युनिटी रेडीओ केंद्राचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी रेडीओ विकास भारती या मोबाईल ऍपचे लॉंचिंग जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांचे हस्ते करण्यात आले. या मोबाईल ऍपव्दारे जगातून कुठल्याही स्थानावरून रेडीओ ऐकता येईल. कृषि विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ पद्माकर कुंदे लिखित गांडूळ खत निर्मिती या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबारचे विशेषज्ञ जयंत उत्तरवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन रेडीओ स्टेशनचे हेड राहुल ठाकरे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी डॉ. हेडगेवार सेवा समितीचे विश्वस्त रंगनाथ नवले, पाटीलभाऊ माळी, स्वप्नील पाटील, कृष्णा गांधी, केदारनाथ कवडीवाले, वासुदेव राव,जत्र्याबाबा पावरा, सौ. अर्चनाताई वळवी उपस्थित होते.
जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी, महिला बचत गटाच्या महिला, मुक्त कृषि शिक्षण केंद्राचे विद्यार्थी, निक्रा प्रकल्पातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्राचे यु. डी. पाटील, सौ. आरती देशमुख, राजेश भावसार, विजय बागल, अरुण कदम, कमलकिशोर देशमुख, कल्याण पाटील, किरण मराठे, रजेसिंग राजपूत, तसेच रेडीओ केंद्राचे कार्यक्रम अधिकारी केतकी जानवे यांनी परिश्रम केले.