Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री चौधरी यांच्या समवेत भाजपा संघटन बैठकीत डॉ. हिना गावित यांचाही प्रमुख सहभाग

team by team
November 28, 2026
in राजकीय
0
उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री चौधरी यांच्या समवेत भाजपा संघटन बैठकीत डॉ. हिना गावित यांचाही प्रमुख सहभाग

नंदुरबार l प्रतिनिधी-

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री पंकज चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे पार पडलेल्या भाजपाच्या महत्त्वपूर्ण संघटन बैठकीत संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनाही व्यासपीठावर उपस्थित राहून तेथील कार्यकर्त्यांशी संवाद करण्याची संधी मिळाली.

उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक आणि प्रचारात्मक पूर्वतयारी सुरू आहे. त्या अनुषंगाने भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्यावर विस्तारक पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली असून सध्या डॉ हिना गावित उत्तर प्रदेशातील कुशीनगर विधानसभा क्षेत्रात स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या समवेत जनतेशी संवाद करण्यासाठी वेगवेगळ्या भागात भेटी देत आहेत. कुशीनगर येथे पार पडलेल्या भाजपाच्या संघटनात्मक बैठकीलाही विस्तारक म्हणून माजी खासदार डॉक्टर हिना यांनी उपस्थित राहून सहभाग घेतला. उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री तथा भाजपा प्रदेश अध्यक्ष पंकज चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक पार पडली. त्या प्रसंगी हाटा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहन वर्मा, कुशीनगर भाजपा जिल्हा अध्यक्ष दुर्गेश रॉय आणि अन्य मान्यवर देखील व्यासपीठावर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांसह डॉक्टर हिना गावित यांनी उपस्थित कार्यकर्त्यांच्या समस्या व सूचना समजून घेत मार्गदर्शन केले. दरम्यान, उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री पंकज चौधरी यांनी डॉक्टर हिना गावित यांच्या राजकीय वाटचालीचे आणि विकास कार्याचे कौतुक केले तसेच शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात पोलीस अंमलदार अटकेत; जिल्हा दलातून निलंबित

Next Post

डॉ. विजयकुमार गावित यांनी मान्यता मिळवलेल्या नर्मदा–तापी वळण योजनेला भरघोस निधी; राज्य सरकारचे व पालकमंत्र्यांचे मानले आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एल निनोच्या संभाव्य दुष्काळसदृश स्थितीवर नळवे खुर्द येथे जनजागृती; एस. ए. मिशन हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम

एल निनोच्या संभाव्य दुष्काळसदृश स्थितीवर नळवे खुर्द येथे जनजागृती; एस. ए. मिशन हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम

November 28, 2026
एस. ए. मिशन विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

एस. ए. मिशन विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

November 28, 2026
डॉ. विजयकुमार गावित यांनी मान्यता मिळवलेल्या नर्मदा–तापी वळण योजनेला भरघोस निधी; राज्य सरकारचे व पालकमंत्र्यांचे मानले आभार

डॉ. विजयकुमार गावित यांनी मान्यता मिळवलेल्या नर्मदा–तापी वळण योजनेला भरघोस निधी; राज्य सरकारचे व पालकमंत्र्यांचे मानले आभार

November 28, 2026
उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री चौधरी यांच्या समवेत भाजपा संघटन बैठकीत डॉ. हिना गावित यांचाही प्रमुख सहभाग

उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री चौधरी यांच्या समवेत भाजपा संघटन बैठकीत डॉ. हिना गावित यांचाही प्रमुख सहभाग

November 28, 2026
लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात पोलीस अंमलदार अटकेत; जिल्हा दलातून निलंबित

लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात पोलीस अंमलदार अटकेत; जिल्हा दलातून निलंबित

November 28, 2026
एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा

एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा

November 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add