नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यातील नांदरखे येथील प्रगती विद्या प्रसारक संस्था संचलित नंदुरबार वि.जा. भ.ज. प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, शाळेत दीपावली सणानिमित्त कार्यानुभव या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून आकर्षक आकाशकंदील तयार केले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सर्जनशीलता, कलात्मकता, हस्तकौशल्य आणि स्वावलंबनाचे महत्त्व समजले. विद्यार्थ्यांनी विविध रंगांचे कागद, सजावटीचे साहित्य यांचा वापर करून सुंदर व आकर्षक आकाशकंदील तयार केले. विद्यार्थ्यांच्या या कलाकृतींमधून त्यांच्या कल्पकतेचे व सुप्त कलागुणांचे दर्शन घडले.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकाशकंदिलांचे माध्यमिक मुख्याध्यापिका प्राप्ती पाटील , प्राथमिक मुख्याध्यापक सागर नामगे , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, दीपावलीचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.







