नंदुरबार l प्रतिनिधी-
खोकराळे ता. नंदुरबार येथील का. वि. प्र. संस्था, भालेर संचलित माध्यमिक विद्यालयात खोकराळे येथे संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष भास्कर हिरामण पाटील यांच्या प्रेरणेने, कार्याध्यक्ष विजय बोरसे व उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाने लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व भारताच्या माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ शिक्षक एस. जी. मन्सुरी यांनी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. यावेळी मुख्याध्यापक पी. एस. सूर्यवंशी, वरिष्ठ शिक्षक ए. बी. पाटील सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मता व अखंडतेची शपथ घेतली. मुख्याध्यापक श्री. सूर्यवंशी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री म्हणून त्यांनी देशातील संस्थानांचे विलीनीकरण करून भारताच्या एकात्मतेसाठी केलेले ऐतिहासिक कार्य, त्यांची कणखर नेतृत्वशैली आणि राष्ट्रनिष्ठा यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
भारत हा विविध जाती, धर्म, भाषा, संस्कृती व प्रांतांनी नटलेला देश आहे. ही विविधता जपत राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव टिकवून ठेवणे हीच खरी भारतीयत्वाची ओळख आहे. देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान दिले पाहिजे, असा महत्त्वपूर्ण संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.
सूत्रसंचालन एस. बी. बागुल यांनी केले. राष्ट्रीय एकात्मतेची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला .








