Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दोन ठिकाणी गांजाची शेती उद्ध्वस्त; ६५ लाखांचा १३० किलो गांजा जप्त

team by team
September 7, 2026
in क्राईम
0
दोन ठिकाणी गांजाची शेती उद्ध्वस्त; ६५ लाखांचा १३० किलो गांजा जप्त

नंदुरबार l प्रतिनिधी-:

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अंमली पदार्थांची लागवड, वाहतूक व साठवणुकीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ४ सप्टेंबर रोजी शहादा तालुक्यातील टवळाई आणि धडगाव तालुक्यातील निगदी शिवारात एकाच दिवशी दोन स्वतंत्र कारवाया करत तब्बल १३० किलो १०३ ग्रॅम वजनाची, ६५ लाख १८ हजार ४०० रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त केली. या कारवाईत गांजाची बेकायदेशीर लागवड करणाऱ्या घुशा ठुमल्या ब्राम्हणे आणि परशा सन्या वळवी या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आगामी सण व उत्सवांच्या अनुषंगाने अवैध दारूची वाहतूक व साठा, अवैध अग्निशस्त्रे तसेच अंमली पदार्थांची लागवड यासह अवैध प्रकारांवर जास्तीत जास्त कारवाई करण्याच्या सूचना नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने ही धडक कारवाई केली.

टवळाईतून ८.२५ लाखांचा गांजा जप्त

४ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, म्हसावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टवळाई गावाच्या शेतशिवारात एका इसमाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड करून त्याची जोपासना केली आहे. माहिती मिळताच हेमंत पाटील यांनी पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले.

पथकाने टवळाई शिवारातील शेताची पाहणी केली असता तेथे १६ किलो ५१८ ग्रॅम वजनाची ८ लाख २५ हजार ९०० रुपये किमतीची गांजाची झाडे आढळून आली. ही झाडे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आली. याप्रकरणी घुशा ठुमल्या ब्राम्हणे (रा. टवळाई, ता. शहादा, जि. नंदुरबार) यास ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ मधील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निगदीत ५६.९२ लाखांची गांजाची शेती

याच दिवशी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना धडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निगदी गावाच्या शेतशिवारात एका इसमाने गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने निगदी शिवारात पाहणी केली असता ११३ किलो ८५ ग्रॅम वजनाची तब्बल ५६ लाख ९२ हजार ५०० रुपये किमतीची गांजाची झाडे आढळून आली.

ही गांजाची झाडे परशा सन्या वळवी (वय ४०, रा. वाहनीपाडा, निगदी शिवार, ता. धडगाव, जि. नंदुरबार) याने त्याच्या राहत्या घराच्या आजूबाजूला असलेल्या वडिलोपार्जित वनजमिनीत मका व भुईमूग या आंतरपिकात बेकायदेशीररीत्या लावून त्यांची जोपासना केल्याचे आढळून आले. पोलिसांनी गांजाची झाडे योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेतली. परशा वळवी यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण १३० किलो १०३ ग्रॅम गांजाची झाडे आणि ६५ लाख १८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या कारवायांमुळे जिल्ह्यात गांजाची बेकायदेशीर शेती करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक राकेश वसावे, पोलीस हवालदार जितेंद्र पाडवी, ज्ञानेश्वर पाटील, योगेंद्र सोनार, दिनेश चित्ते, स्वप्नील गोसावी, मुकेश तावडे, तसेच पोलीस अंमलदार राहुल बोराळे, शोएब शेख, भरत उगले, मनोज महाजन, अनिल नागरगोजे, अभय राजपुत, निशीगंध गवळे, हेमंत बारी, विनोद पाटील आणि रविंद्र अहिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातमी शेअर करा
Previous Post

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

Next Post

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

Next Post
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026
दोन ठिकाणी गांजाची शेती उद्ध्वस्त; ६५ लाखांचा १३० किलो गांजा जप्त

दोन ठिकाणी गांजाची शेती उद्ध्वस्त; ६५ लाखांचा १३० किलो गांजा जप्त

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add