Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

team by team
August 26, 2026
in राज्य
0
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

नंदुरबार l प्रतिनिधी-

राज्यातील तृतीयपंथीय घटकांतील व्यक्तींची सर्वांगीण उन्नती व्हावी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता यावे, या उद्देशाने पंचायत समिती, शहादा येथे विशेष जाणिव जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नंदुरबार व पंचायत समिती, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा पार पडली, अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

शासनाच्या 11 मार्च 2024 च्या सर्वकष धोरणानुसार आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर व उपस्थित तृतीयपंथीयांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रास्ताविकात समाज कल्याण निरीक्षक सचिन वसंत जगताप यांनी कार्यशाळेमागील भूमिका स्पष्ट केली. अशासकीय सदस्य राजू ठाकरे यांनी तृतीयपंथीयांचे हक्क, कायदे व विविध कल्याणकारी योजनांबाबत सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमात पंचायत समितीच्या योजनांविषयी सहाय्यक गट विकास अधिकारी विकास राठोड यांनी मार्गदर्शन केले. गट विकास अधिकारी महेश पोतदार यांनी तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी पंचायत समितीमार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असा विश्वास दिला; तसेच घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याबाबत आश्वस्त केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 13 मार्च 2026 च्या शासन निर्णयानुसार तृतीयपंथीयांसाठी सुरू केलेल्या ‘बीज भांडवल योजने’अंतर्गत व्यवसाय व कर्ज प्रकरणांच्या प्रक्रियेची माहिती सचिन जगताप यांनी दिली.

या कार्यक्रमास विस्तार अधिकारी संजय मराठे, अशासकीय सदस्य इरफान पिंजारी, बार्टी संस्थेच्या अतिरिक्त प्रकल्प अधिकारी मीनाक्षी दांडवेकर, स्मार्ट सर्व्हिसेसचे शुभम जावरे, राकेश पावरा यांच्यासह तृतीयपंथी प्रतिनिधी गौरी गुरु आरती नायक, गोपी जान, सनम जान, सोनाली कुवर, शिवानी कर्मा आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

August 26, 2026
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add