Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

मतदार यादी शुद्धीकरण मोहीम गतिमान

team by team
August 22, 2026
in राज्य
0
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

नंदुरबार l प्रतिनिधी-

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारित ‘विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम’ (SIR-2026) चे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांत मतदार केंद्रांचे सुसूत्रीकरण, पुनर्रचना आणि मतदार यादी शुद्धीकरणासाठी गैरहजर/स्थलांतर/मयत/दुबार (ASDD)सर्वेक्षण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

 

संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक
निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार पुनरीक्षण उपक्रमांचे टप्पे पुढीलप्रमाणे राहतील:
24 ऑगस्ट 2026: मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना पूर्ण करणे.
31 ऑगस्ट 2026: मसुदा मतदार यादीची प्रसिद्धी (Draft Publication). 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026: मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी.
31 ऑगस्ट ते 29 ऑक्टोबर 2026: नोटीस टप्पा आणि प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा.
• 04 नोव्हेंबर 2026: अंतिम मतदार यादीची अधिकृत प्रसिद्धी (Final Publication).

मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना:
मतदारांना मतदानाच्या दिवशी सुलभता यावी आणि केंद्रांवर अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी निकषानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, विलीनीकरण आणि नवीन केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.
• अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ: मुळ 365 केंद्रांमध्ये 03 नवीन केंद्रे (काठी-64, गेंदा-210, खडकी-213) समाविष्ट करून आता एकूण 368 केंद्रे प्रस्तावित आहेत.

• शहादा विधानसभा मतदारसंघ: कमी मतदार संख्या असलेले लोणखेडा येथील केंद्र क्र. 150 हे केंद्र क्र. 151 मध्ये विलीन करण्यात आल्याने येथील संख्या 366 वरून 365 केंद्रे झाली आहे.

• नंदुरबार विधानसभा मतदारसंघ: शिरुड दिगर व नांदखें येथील केंद्रांची पुनर्रचना करून दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूलमधील केंद्र क्र. 302 हे 301 मध्ये विलीन करण्यात आले; तसेच टेंभे तर्फे शहादा येथे 01 नवीन केंद्र निर्माण झाल्याने एकूण संख्या 367 केंद्रे कायम राहिली आहे.

• नवापूर विधानसभा मतदारसंघ: मुळ 336 केंद्रांमध्ये राजापूर (केंद्र क्र. 39) हे 1 नवीन केंद्र प्रस्तावित करण्यात आल्यामुळे एकूण 337 केंद्रे झाली आहेत.

या बदलानुसार संपूर्ण जिल्ह्यात मूळ 1 हजार 434 केंद्रांऐवजी आता 1 हजार 437 मतदान केंद्रे कार्यरत राहतील.

ASDD (Absent, Shifted, Death, Duplicate) मतदार सर्वेक्षण
मतदार यादी अत्यंत शुद्ध, अचूक व पारदर्शक करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून मतदारांची घरोघरी पडताळणी करण्यात आली.
• एकूण मतदार संख्या: 13,48,574
• डिजिटाईज्ड मतदार (EFs Digitized): 11,59,854
• गैरहजर/स्थलांतर/मयत/दुबार (UEF) नोंदी: 1,88,720

तालुकानिहाय ASDD (Absent, Shifted, Death, Duplicate) स्थिती:
• अक्कलकुवा: 3,32,786 मतदारांपैकी 49,504 नोंदी (डिजिटाईज्ड: 2,83,282 | मयत: 10,743 | स्थलांतरित: 24,852 | दुबार: 10,259 | गैरहजर: 3,228 | इतर: 430).
• शहादा: 3,57,096 मतदारांपैकी 53,532 नोंदी (डिजिटाईज्ड: 3,04564 | मयत: 14,488 | स्थलांतरित: 20,888 | दुबार: 9,364 | गैरहजर: 7,553 | इतर: 239).
• नंदुरबार: 3,60,701 मतदारांपैकी 58,869 नोंदी (डिजिटाईज्ड: 3,01832 | मयत: 16,244 | स्थलांतरित: 28,087 | दुबार: 9,541 | गैरहजर: 4,528 | इतर: 469).
• नवापूर: 2,97,991 मतदारांपैकी 27,895 नोंदी (डिजिटाईज्ड: 2,70,176 | मयत: 7,775 | स्थलांतरित: 13,993 | दुबार: 3,924 | गैरहजर: 2,670 | इतर: 253).
(जिल्ह्यात एकूण डिजिटाईज्ड: 11,59,854, मयत 49,250, स्थलांतरित 87,020, दुबार 33,080, गैरहजर 17,979 व इतर 1,392 नोंदी आढळल्या आहेत.)

नागरिकांना व राजकीय पक्षांना आवाहन:
31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या मसुदा मतदार यादीची सर्व नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी बारकाईने पाहणी करावी. मतदार यादीत नाव नोंदवणे, वगळणे अथवा दुरुस्तीसाठी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा तहसील कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत, असेही आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

Next Post

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

Next Post
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026
हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add