Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

team by team
August 22, 2026
in राजकीय
0
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार नगरपालिकेच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाची वाढविण्यात आलेली फी तात्काळ कमी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी सर्वसाधारण सभेत केली. याबाबत त्यांनी सभेत निवेदनही दिले. वाढीव शुल्क कमी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

 

पूर्वी जलतरण तलावाची वार्षिक फी 5,000 रुपये होती. मात्र, ती वाढवून 20,000 रुपये करण्यात आली आहे. तसेच दररोजचे शुल्क 50 रुपयांवरून 100 रुपये करण्यात आले आहे. ही शुल्कवाढ अन्यायकारक असून, ती तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी चौधरी यांनी केली.
नंदुरबारमधील आदिवासी मुलांना राज्यस्तरीय जलतरण स्पर्धांमध्ये सहभागी होता यावे, या उद्देशाने जलतरण तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, अवाजवी शुल्कवाढीमुळे या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नाशिक महानगरपालिकेच्या जलतरण तलावाची वार्षिक फी 6,815 रुपये असताना नंदुरबारमध्ये 20,000 रुपये शुल्क आकारणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

 

याशिवाय पालकांना जलतरण तलावात जाण्यासाठी बागेतून प्रवेश घ्यावा लागतो आणि त्यासाठी स्वतंत्र 10 रुपये शुल्क आकारले जाते. यामुळे पालक आणि ठेकेदार यांच्यात दररोज वाद होत असल्याचेही चौधरी यांनी सभेत निदर्शनास आणून दिले.
ठेकेदाराने शुल्कवाढ करताना प्रशासनाची परवानगी घेतली होती का? हा विषय कोणत्या सभेत मांडण्यात आला होता? तसेच नगरपालिकेच्या ठराव क्रमांक 7 ची माहिती आम्हाला देण्यात आली नाही, त्यामुळे या ठरावाला आमचा विरोध कायम आहे, असेही हिरालाल चौधरी यांनी सांगितले.

जलतरण तलावाचा विषय पुढील सर्वसाधारण सभेत आयत्या वेळेस घेण्यात येईल, असे आश्वासन नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी दिल्याचे चौधरी यांनी सांगितले.

यावेळी गटनेते आनंद माळी,नगरसेवक पंकज चौधरी,रेखा चौधरी,शोभा चौधरी,सारिका माळी नीता मराठे, सुष्मा गावीत,लक्ष्मण माळी, प्रकाश भोई, आकाश चौधरी, संतोष वसईकर, विक्की मराठे, दीपक चौधरी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

Next Post

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

Next Post
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

October 6, 2026
भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

October 6, 2026
शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षण परिषद

शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षण परिषद

October 4, 2026
गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम

गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम

October 4, 2026
पालिका पाणीपुरवठा योजना चांगल्या दर्जाची करणार;आ. चंद्रकांत रघुवंशी

पालिका पाणीपुरवठा योजना चांगल्या दर्जाची करणार;आ. चंद्रकांत रघुवंशी

October 4, 2026
नांदरखे आश्रम शाळेत स्वच्छता अभियान उत्साहात

नांदरखे आश्रम शाळेत स्वच्छता अभियान उत्साहात

October 3, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add