नंदुरबार l प्रतिनिधी
खोकराळे ता.जि. नंदुरबार येथील काकेश्वर विद्या प्रसारक संस्था भालेर ता.जि. नंदुरबार संचलित माध्यमिक विद्यालयात 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी गावातून प्रभात फेरी काढली नंतर शाळेच्या पटांगणावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानि विजयसिंह राजपूत होते, ध्वजारोहण ज्ञानेश्वर आडगाडे यांनी केले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रीय झेंड्याला सर्वांनी सलामी दिल्यानंतर राष्ट्रगीत, झंडा गीत, राज्य गीत गायन करण्यात आले, नशा मुक्त व तंबाखूमुक्तची प्रतिज्ञा सर्व उपस्थित नागरिक व विद्यार्थी यांच्याकडून विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक एस.जी. एस.मन्सुरी वदवून घेतली.
विद्यार्थ्यांनि संगीत कवायत व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला .यामध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाबद्दल आपले विचार मांडले, विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे गायन केले अशाप्रकारे शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने व सहभागाने स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेवटी आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला









