नंदुरबार l प्रतिनिधी-
भादवड ता. नंदुरबार येथील नं. ता. वि. स. संचलित श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
वृक्षदिंडीत झाडे लावा झाडे जगवा, ज्ञानोबा माऊली तुकाराम असा ठेका घेत मृदुंग व ढोलकीच्या तालावर जिल्हा परिषद मराठी शाळेचे विद्यार्थी व विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ठेका धरला, पारंपारिक पोशाख परिधान करून सर्व विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले प्रभात फेरीनंतर विद्यालयाच्या पटांगणामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. बी .पाटील, सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व सहकारी व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून आपापल्या झाडाची जबाबदारी स्वीकारली. वृक्षारोपणानंतर विद्यार्थ्यांनी विविध नृत्यांद्वारे आपल्यातील कलागुणांचे दर्शन घडवले संपूर्ण शालेय वातावरण आनंदी व प्रसन्न झाले










