नंदूरबार l प्रतिनिधी
पथराई ता. नंदुरबार येथील के. डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीतील विविध जिवंत देखावे, महापुरुष, महानायक तसेच सांस्कृतिक नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुमार गावित, संचालिका इलाताई गावित, सचिव डॉ. विभूती गावित, सचिव ऋषिका गावित, प्राचार्य शरद पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, जल, जमीन, जंगल या नैसर्गिक संसाधनांचा जबाबदारीने वापर आणि भावी पिढ्यांसाठी शाश्वत विकासाचा संदेश दिला. याप्रसंगी के.डी गावीत शैक्षणिक संकुलातील के डी गावित सैनिकी विद्यालय, इंग्लिश मीडियम स्कूल, दामजी पोसला आयुर्वेद महाविद्यालय, बी एम एस कॉलेज, आईसाहेब जयाबाई नरसिंग महाविद्यालय यातील सर्व विद्यार्थी सहभागी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रजनी करेल यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजन उमेश राजपूत व संगीता वळवी यांनी केले.कार्यक्रमास संकुलातील सर्व प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.











