नंदुरबार l प्रतिनिधी-
विखरण ता. नंदुरबार येथील श्री.धंगाई विधायक कार्य मंडळ संचलित श्री. आप्पासाो.आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालयात संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण,संस्कृतीचे संवर्धन आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी नऊ ऑगस्ट हा दिवस साजरा करण्यात येत आहे.
मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांनी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले .व विविध आदिवासी नायकांनी आपल्या बांधवांच्या हक्कासाठी व देशाला स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेणाऱ्या विविध विरांचे जीवनचरित्र आपल्या मनोगतातून मांडले. विद्यालयाचे उपशिक्षक सी. व्ही.नांद्रे यांनी विश्व आदिवासी गौरव दिनाचे महत्त्व व उद्देश आदिवासी समाजाची परंपरा,भाषा, कला,संस्कृती,रूढी आणि निसर्गाशी असलेले नाते यांचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे आपल्या मनोगतात व्यक्त केले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या परंपरेला,संस्कृतीला साजेशी वेशभूषा करून सिबली, धनुष्यबाण,ध्वज पताका व आदिवासी बांधवांचा पारंपारिक पेहराव करून विखरण गावातून रॅलीद्वारे नृत्याचा ठेका धरत विविध घोष वाक्यांच्या गजरात मिरवणूक काढली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.बी.भारती,वाय.डी.बागुल यांनी तर आभार एम.डी.नेरकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस.जी.पाटील व एच. एम.खैरनार यांनी संयोजन केले.











