Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

team by team
August 11, 2026
in Uncategorized
0
माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी-

जिल्हा निर्मितीचे शिल्पकार महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. विजयकुमार गावित यांचा दि. 15 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यंदाही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून त्यात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या वतीने कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉ. ईश्वर धामणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वाढदिवसानिमित्त क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सिनीयर गट पुरुष 21 कि.मी. व सिनीयर गट महिला 10 कि.मी. मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन दि. 14 ऑगस्ट 2026 शुक्रवार रोजी सकाळी 7 वाजता आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवास स्थानापासुन करण्यात आले आहे. तरी सर्व शाळा व महाविद्यालयाच्या संस्थाचालकांनी या स्पर्धेत आपल्या जुनियर कॉलेज व महाविद्यालयातील पुरुष व महिला खेळाडूंना मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करुन विजय गौरव क्रीडा महोत्सव आयोजन समितीस सहकार्य करावे तसेच आपल्या जुनियज कॉलेज व महाविद्यालयातील क्रीडा शिक्षकास खेळाडूंसोबत पाठवावे.

मॅरेथॉनचा मार्ग आणि पारितोषिकाचे स्वरूप

या स्पर्धेचा मार्ग माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवास स्थानापासून यशवंत विद्यालय – जी.टी.पाटील महाविद्यालय रोड – आंधारे चौक – राणा प्रताप पुतळा बस स्टॅण्ड नेहरु पुतळा गांधी पुतळा उड्डाण पुल गिरीविहार गेट स्वागत पेट्रोलपंप – करण चौफुली – पातोंडा गाव, सप्तश्रृंगी मंदिरापर्यंत परत त्याच मार्गे डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवास स्थानापर्यंत. असा मॅरेथॉनचा मार्ग राहणार आहे. यात विजयी होणाऱ्या प्रथम पाच क्रमांकांना रोख पारितोषिक सन्मान चिन्ह व प्रशस्ती प्रमाण पत्र प्रदान करण्यात येईल. त्याचे स्वरूप याप्रमाणे- ११ वी ते सिनीयर पुरुष गट (21 किमी)- प्रथम 11000 रुपये, व्दितीय 7100 रुपये, तृतीय 5100 रुपये, चतुर्थ 3100 रुपये तर पाचशे 2100 रुपये. त्याचप्रमाणे ११ वी ते सिनीयर महिला गट (10 किमी)- प्रथम 11000 रुपये, व्दितीय 7100 रुपये, तृतीय 5100 रुपये, चतुर्थ 3100 रुपये तर पाचशे 2100 रुपये. याप्रमाणे पारितोषिक रक्कम दिली जाणार आहे.

अनिवार्यता आणि संपर्क क्रमांक

सदर मॅरेथॉन स्पर्धा धुळे जिल्हा व नंदुरबार जिल्हा मर्यादित असून सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना आधार कार्ड अनिवार्य असेल. पारितोषिक वितरण समारंभ दि. 15 ऑगस्ट 2026 दुपारी 12 वाजता मा. डॉ. विजयकुमार गावित साहेबांच्या निवास स्थानावर होईल. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी प्रा.डॉ. ईश्वर धामणे-९४२२२८५७०९, प्रा. बळवंत निकुंभ – ८७८८८७६०४४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असेही समितीच्या वतीने कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉ. ईश्वर धामणे यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

एक कोटींचे बायोडिझेलसह तीन टँकर जप्त, तिघांना अटक

Next Post

देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

Next Post
देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026
आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

August 11, 2026
देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

August 11, 2026
माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add