नंदुरबार l प्रतिनिधी-
पश्चिम बंगाल राज्यात भारतीय जनता पक्षाने मिळविलेल्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार येथे आमदार निवासस्थानी भाजपा तर्फे उत्साहात जल्लोष करण्यात आला.
या कार्यक्रमास माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी उपस्थितांनी फटाके फोडून, मिठाई वाटून व घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. देशभरात भाजपाच्या धोरणांवर जनतेचा वाढता विश्वास या विजयातून दिसून येत असल्याचे मत उपस्थित नेत्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी नगर परिषद विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, नगरसेवक आनंदा माळी, लक्षण माळी, चारुदत्त कळवणकर, पंकज चौधरी, नगरसेविका अनिता मराठे, शोभा चौधरी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चौधरी, नरेंद्र माळी, संतोष वसईकर, आकाश चौधरी, ईश्वर धामणे, माणिक माळी, दीपक चौधरी, केतन रघुवंशी, धनराज माळी, भूषण सोनार, विष्णु पाटील, उमा चौधरी, विक्की मराठे, जगदीश पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








