Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आरोग्य विभागाची गट-क परीक्षा २४ ऑक्टोबर व गट-ड परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी

team by team
October 22, 2021
in आरोग्य
0
नंदुरबार l प्रतिनिधी
कोरोना १९ च्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करणे निकडीचे असल्याने शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवेतील गट-क व गड-ड सर्व रिक्त पदे भरण्यास मान्यता दिलेली होती. त्यानुसार गट-क संवर्गाचे २ हजार ७३९ व गट-ड संवर्गाचे ३ हजार ४६६ पदांची, असे एकूण ६ हजार २०५ पदांची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार गट-क संवर्गाची लेखी परीक्षा २४ ऑक्टोबर २०२१ रोजी व गट-ड संवर्गाची लेखी परीक्षा ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ यांनी दिली आहे.
▪️परीक्षा घेणाऱ्या न्यासा या कंपनीस सर्व उमेदवारांना प्रवेश पत्र ईमेल, व्हाटस-अप मोबाईल वर पाठवून देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. कंपनीव्दारे केल्या जाणारी बैठक व्यवस्था, केंद्राचे आरक्षण, कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार बैठक व्यवस्थेचे नियोजन, केंद्रामध्ये जॅमर बसविणे, प्रवेश पत्र निर्गमित करणे, प्रश्नपत्रिकांचे वाटप आदी न्यासा कंपनीमार्फत  केले जात आहे.
▪️सदरील भरती परिक्षा राज्यस्तरावरील २४ आणि मंडळ स्तरावरील २८ अशा एकूण ५२ संवर्गासाठी घेण्यात येत आहे.राज्य स्तरावरील संवर्गाचे नेमणूक अधिकारी हे संबधित सहसंचालक असून मंडळ स्तरावरील पदांचे नेमणुक अधिकारी ८ उपसंचालक मंडळे आहेत. नाशिक परिमंडळात गट-क मधील ६८ हजार ६८६ उमेदवार परिक्षा देण्यार असून तिन्ही जिल्हयातील एकुण १४२ परिक्षा केंद्रावर उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा प्रथम सत्रात १८ हजार ०८७, व्दितीय सत्रात १८हजार १८३ उमेदवार परीक्षा देणार आहेत. जळगाव जिल्ह्यात द्वितीय सत्रात १४ हजार ७४८ तर अहमदनगर जिल्ह्यात दितीय सत्रात १७ हजार ६६८ उमेदवार परीक्षा देणार आहेत.
▪️या आरोग्य विभागाच्या भरती मध्ये पुणे ब्युरो कार्यालयातील १)केमीकल असिस्टंट २) सांख्यिकी सहाय्यक ३) औषध निर्माण अधिकारी ४) कनिष्ठ लिपीक या ४ संवर्गाची परिक्षा अहमदनगर जिल्हयात होत असून त्या पदांचे पुणे ब्युरो कार्यालय हेच नियुक्ती कार्यालय आहे.त्यामुळे त्या पदांकरिता अर्ज केलेल्या राज्यभरातील  उमेदवारांना  अहमदनगर जिल्हयात प्रवेश पत्र मिळालेली आहेत.
▪️उपसंचालक,आरोग्य सेवा ,नाशिक मंडळ ,नाशिक या कार्यालयात मे,न्यासा कम्युनिकेशन या कंपनीने २ प्रतिनिधी नेमून हेल्प डेस्क स्थापन केलेले असून अडमिड कार्ड व इतर शंकाचे निरसन करण्यासाठी उमेदवारांनी  ९५१३३ १५५३५ , ७२९२०१३५५०, ९५१३५००२०३ क्रमांकावर संपर्क साधावा, असेही डॉ.गांडाळ यांनी कळविले आहे. तसेच गट ड बाबतची परीक्षा ३१ऑक्टोबर २०२१ला होणार आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नागरिकांनी केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ घ्यावा: जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्यास परवानगी

Next Post

शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्यास परवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add