नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेने झालेल्या निधनाने नंदुरबारातील त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. ‘नंदुरबार पालिकेची इमारत बारामतीचीही नाही’ अशा शब्दात त्यांनी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशींचे कौतुक केले होते.
गेल्या वर्षांपूर्वी अजित पवार राज्याचे विरोधी पक्ष नेते असताना नंदुरबारचा दौऱ्यावर आले होते.त्यावेळी त्यांनी आ.चंद्रकांत रघुवंशींच्या आग्रहाखातर नगरपालिका इमारतीला भेट दिली होती. नूतन नगरपालिका इमारत बांधकामासाठी आपण कसा संघर्ष केला याची कहाणी आ.चंद्रकांत रघुवंशींनी अजितदादांना दिली होती. पालिकेत आल्यानंतर अजित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले होते. त्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सर्व सभापतींच्या दालनासह विविध खाते प्रमुखांच्या कार्यालयांच्या देखील भेटी दिल्या होत्या.
पालिकेचे प्रशस्त सभागृह पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार आवक झाल्याचे पाहायला मिळाले होते.यावेळी त्यांनी उपस्थित शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार स्वीकारत सन्मान स्वीकारला होता. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली दुःखद निधनाने आमदार चंद्रकांत रघुवंशींनी शोक व्यक्त केलेला आहे.








